शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

विद्यार्थ्यांकडून ‘पीएमपी’ला रामराम : पासची संख्या रोडावतेय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 07:00 IST

बसला पर्याय म्हणून स्कुल बस, व्हॅन, रिक्षा तसेच खासगी वाहनांचा वापर वाढल्याचे दिसत आहे...

ठळक मुद्देस्कुल बस, व्हॅन, खासगी वाहनांचा वापर वाढला दुसरीकडे ‘पीएमपी’ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होत आहे कमी२०१५ यावर्षी ऑगस्ट महिन्यात एकूण विद्यार्थी पासची संख्या सुमारे ७० हजार एवढी ठराविक मार्गासाठी सप्टेबर व ऑक्टोबर २०१७ मध्ये असलेल्या पासही त्यांनी केला होता बंद मागील काही वर्षांत पीएमपीला पसंती देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत चालल्याचे चित्र

पुणे : खिळखिळ्या बस, वाढते ब्रेकडाऊन, वेळेतील अनियमितता, अपघाताचे प्रमाण यामुळे मागील काही वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोडावली आहे. बसला पर्याय म्हणून स्कुल बस, व्हॅन, रिक्षा तसेच खासगी वाहनांचा वापर वाढल्याचे दिसत आहे. शहर व लगतच्या परिसरात शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाच्या अनेक सुविधा निर्माण होत आहेत. नवनवीन शैक्षणिक संस्थांची भर पडत आहे. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढाही वाढला आहे. एकीकडे विद्यार्थी संख्येत प्रचंड वाढ होत असताना दुसरीकडे ‘पीएमपी’ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात पास दिले जातात. महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पास दिला जातो. या विद्यार्थ्यांच्या पासचे पैसे दोन्ही महापालिकांकडून पीएमपीला मिळतात. तर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना पास रकमेत २५ टक्के तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे सुरूवातीपासून या योजनेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण मागील काही वर्षांत पीएमपीला पसंती देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत चालल्याचे चित्र आहे. ‘पीएमपी’ प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०१५ यावर्षी ऑगस्ट महिन्यात एकूण विद्यार्थी पासची संख्या सुमारे ७० हजार एवढी होती. पण यावर्षी हा आकडा तब्बल ३० हजाराने कमी झाला आहे. मागील पाच वर्षात पासच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पास सुसूत्रीकरणामध्ये महापालिका क्षेत्रासाठी असलेला ६०० रुपयांचा मासिक पास बंद करून केवळ ७५० रुपयांचा एकच पास सुरू ठेवला. तसेच सप्टेबर व ऑक्टोबर २०१७ मध्ये ठराविक मार्गासाठी असलेल्या पासही त्यांनी बंद केला होता. त्यामुळे विद्यार्थी संख्येत घट झाली होती. त्यावर प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंढे यांची बदली झाल्यानंतर पंचिंग पास सुरू केला. पण त्यानंतरही विद्यार्थी पास वाढविण्यात पीएमपी प्रशासनाला यश आलेले नाही.--विद्यार्थी पासइयत्ता ५वी ते १२ वी (पालिका शाळा) - मोफत (ठराविक मार्ग)खासगी शाळा - ७५ टक्के सवलतखासगी महाविद्यालये - ५० टक्के सवलत (७५० रुपये)पंचिंग पास - ठराविक मार्गांसाठी............मागील काही वर्षात पीएमपीला उतरली कळा लागली होती. नवीन बस ताफ्यात येत नसल्याने जुन्या बसवरच प्रवाशांची भिस्त होती. त्यामुळे खिळखिळ््या झालेल्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत होता. ब्रेकडाऊन व अपघाताचे प्रमाणही अधिक होते. बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना मनस्ताव सहन करावा लागत होता. परिणामी विद्यार्थ्यांसाठी इतर प्रवाशांकडूनही पाठ फिरविली जात आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने तसेच शाळा, महाविद्यालयांच्या वेळा गाठण्यासाठी विद्यार्थ्यांकडून खासगी वाहनांसह स्कुल बस, व्हॅन, रिक्षाचा वापर अधिक वाढू लागला आहे. त्याचा फटका पीेमपीला बसत आहे.मागील वर्षीपासून ताफ्यात नवीन बस दाखल होऊ लागल्या असून खिळखिळ््या झालेल्या बस भंगारात काढल्या जात आहेत. अत्याधुनिक ई-बस प्रवाशांना आकर्षित करत आहेत. आणखी शेकडो नवीन बस येणार असल्याने पीएमपीचा बस ताफा सुसज्ज होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच इतर प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत जाईल, असे पीएमपी अधिकाºयांकडून सांगण्यात आले...............मागील काही वर्षातील विद्यार्थी पासची स्थितीमहिना व वर्ष        विद्यार्थी पास संख्या२०१५आॅगस्ट               ७०,२३७सप्टेंबर                 ६७,५०४आॅक्टोबर            ४६,७७४---------२०१६आॅगस्ट               ६३,८६७सप्टेंबर                 ६२,८८४आॅक्टोबर           २३,४९१-------------२०१७ऑगस्ट                ५४,१७५सप्टेंबर                ४४,५९५ऑक्टोबर               २४,८८३---------२०१८ऑगस्ट              ४५,२९४सप्टेंबर               ४५,७५४ऑक्टोबर           ३०,४३०------------२०१९ऑगस्ट             ४१,३०४सप्टेंबर              ४२,६८९

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलtukaram mundheतुकाराम मुंढेNayana Gundeनयना गुंडेStudentविद्यार्थी