Pune News | मैत्रिणीला मेसेज पाठविल्याचा वाद, विद्यार्थ्यांवर वार; दोन जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 09:40 IST2022-11-24T09:38:32+5:302022-11-24T09:40:39+5:30

लष्कर परिसरातील एका शैक्षणिक संस्थेच्या प्रवेशव्दारासमाेर हा प्रकार घडला...

Students stabbed in argument over texting girlfriend; Two students were seriously injured | Pune News | मैत्रिणीला मेसेज पाठविल्याचा वाद, विद्यार्थ्यांवर वार; दोन जण गंभीर जखमी

Pune News | मैत्रिणीला मेसेज पाठविल्याचा वाद, विद्यार्थ्यांवर वार; दोन जण गंभीर जखमी

पुणे : मैत्रिणीला मेसेज पाठविल्याचा जाब विचारल्यामुळे झालेल्या वादातून काॅलेजमधील विद्यार्थ्यांवर काेयता तसेच चाकूने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत दाेन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. लष्कर परिसरातील एका शैक्षणिक संस्थेच्या प्रवेशव्दारासमाेर हा प्रकार घडला.

मुंढवा येथील १९ वर्षीय विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्या काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या दाेन मित्रांसह इतरांविराेधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लष्कर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विद्या्र्थी आणि आराेपी हे एकाच काॅलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. आराेपींपैकी एकाने फिर्यादीच्या मैत्रिणीस मेसेज केला हाेता. त्यावरून फिर्यादीने, तू तिला मेसेज का पाठविलास, असा जाब विचारला. त्याचा राग आल्याने आराेपी मुलाने त्याच्या इतर साथीदारांना बाेलावून घेतले आणि फिर्यादीला लाथा-बुक्क्याने मारहाण करीत त्याच्यावर काेयत्याने वार करून जखमी केले. यावेळी फिर्यादींना वाचविण्यासाठी आलेल्या आलीम शेख (वय १९) याच्यावरही आराेपीने चाकूने वार करीत जखमी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक शितल जाधव या करीत आहेत.

Web Title: Students stabbed in argument over texting girlfriend; Two students were seriously injured