शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे मिळाली

By admin | Updated: July 17, 2015 03:47 IST

अकरावी प्रवेशासाठी जमा केलेली मूळ कागदपत्र परत मिळविण्यासाठी शाळेकडे दहा हजार रुपये शुल्क भरा, असे सांगून विद्यार्थी व पालकांची अडवणूक करणाऱ्या दापोडी येथील

पुणे : अकरावी प्रवेशासाठी जमा केलेली मूळ कागदपत्र परत मिळविण्यासाठी शाळेकडे दहा हजार रुपये शुल्क भरा, असे सांगून विद्यार्थी व पालकांची अडवणूक करणाऱ्या दापोडी येथील न्यू मिलेनियम हायस्कूलने सर्व विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्रे परत केली आहेत. त्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर विद्यार्थी व पालकांमध्ये झालेल्या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा दावा मिलेनियम हायस्कूल प्रशासनाने केला आहे. अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळाल्यानंतर एका विद्यार्थ्याने ५० रुपये शुल्क भरून मिलेनियम हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. परंतु, शाळा घरापासून दूर असल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी येथील प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कागदपत्र परत हवे असतील, तर १० हजार रुपये शुल्क भरा, असे या विद्यार्थ्याला हायस्कूलकडून सांगण्यात आले. ‘लोकमत’ने या घटनेवरील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांची अडवणूक करून त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करणाऱ्या शाळांचे चांगलेच धाबे दणाणले होते. मिलेनियम हायस्कूललाही जाग आली आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे परत दिली. विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव म्हणाले,‘‘अकरावी प्रवेश प्रकियेतून ५० रुपये शुल्क भरून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे द्यावीत. गैरसमजातून अथवा अनावधानानेसुद्धा कागदपत्र देण्यास नकार देऊ नये. प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार १४ जैले रोजी सायंकाळी ४ वाजल्यानंतर प्रवेश रद्द करणे शक्य नव्हते.त्यामुळे शाळेने ठरवून दिलेले शुल्क भरावे,असे पालकांना सुचविले, त्यांच्याकडून नियमबाह्य शुल्क मागितले नाही. त्यांनी प्रसार माध्यमांकडे कळविली.विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नव्हता,असे हायस्कूलतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)