विद्यार्थ्यांचा कागदी प्रवासी पास संपणार

By Admin | Updated: May 25, 2014 05:12 IST2014-05-25T05:12:22+5:302014-05-25T05:12:22+5:30

बारामती एसटी आगारात विद्यार्थ्यांसाठी आता दररोजच्या प्रवासासाठी ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार आहे.

Students' paper travel passes are completed | विद्यार्थ्यांचा कागदी प्रवासी पास संपणार

विद्यार्थ्यांचा कागदी प्रवासी पास संपणार

बारामती : बारामती एसटी आगारात विद्यार्थ्यांसाठी आता दररोजच्या प्रवासासाठी ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार आहे. कागदी पास ऐवजी स्मार्ट कार्ड देण्याची योजना या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक वरिष्ठ रमाकांत गायकवाड यांनी दिली. ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘स्मार्ट कार्ड’चा वापर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला शाळेचे बोनाफाईड, शाळा, महाविद्यालयाच्या ओळखपत्रासह महामंडळाकडे विहित नमुन्यात अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार आहे. दर वर्षी कार्डचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी दरमहा नियमाप्रमाणे प्रवासखर्चाची रक्कम भरून नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे. प्रवास करताना वाहकाला ‘स्मार्ट कार्ड’ दाखवून मशिनमध्ये नोंद करून घेणे आवश्यक आहे. कार्डची मशिनमध्ये नोंद न केल्यास संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)

Web Title: Students' paper travel passes are completed