शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न

By admin | Updated: August 13, 2015 04:31 IST

बारामती शहरातील सातवी इयत्तेतील मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानाने फसला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.

बारामती : बारामती शहरातील सातवी इयत्तेतील मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानाने फसला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत मएसो शाळेच्या मुख्याध्यापकांनी शहर पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, ३ अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार बी. बी. साळुंके करीत आहेत. सकाळी शाळेसाठी एसटी बसने आलेला हा मुलगा पायी तीन हत्ती चौकातून जात होता. नटराज नाट्यगृहासमोरील पदपथावर असताना काळ्या व्हॅनमधून आलेल्या तिघांनी त्याला घेरले. सकाळी गर्दी कमी असते. त्याला चॉकलेट देण्याचा बहाणा केला. त्याच वेळी तिघांपैकी एकाने ‘तुम्ही गाडी सुरू करा, मी याला घेऊन येतो,’ असे सांगितले. त्यामुळे सतर्क झालेल्या या मुलाने त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या हाताचा चावा घेतला. त्याच्या तावडीतून सुटून थेट शाळेकडे धूम ठोकली. या शाळेला तीन प्रवेशद्वार आहेत. बालनिरीक्षण गृहालगतच्या प्रवेशद्वारातून शाळेच्या प्रांगणात तो गेला. त्यामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला. त्याचबरोबर तो आरडाओरडा करत धावत असताना रस्त्यावरील काही नागरिकांनी पाहिले. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी तेथून पलायन केले. हा प्रकार या मुलाने मुख्याध्यापक चव्हाण यांच्यासह शिक्षकांना सांगितला. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या या मुलाने प्रसंगावधान दाखविले. याबाबत मुख्याध्यापक भगवान चव्हाण यांनी शहर पोलिसांसह मुलाच्या पालकांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. काळ्या व्हॅनमधून आलेल्या तिघांनी सुरुवातीला तोंडाला स्कार्प बांधला होता. घडलेली घटना मुलाने पोलिसांना सांगितली. गाडीसह तिघांचे वर्णन त्याच्याकडून घेतले. या प्रकारामुळे शहरात पालकवर्गात मात्र भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)कालच बारामतीत अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी असे प्रकार घडत नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, बारामती शहरातच सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस अधिकाऱ्यांचा दावादेखील फोल ठरला आहे. सर्व शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तींनी दिलेला खाऊ स्वीकारू नये अथवा त्यांच्याबरोबर जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनीदेखील केले आहे.