शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

‘वाणिज्य’साठी चुरस, कला इंग्रजीकडेही ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 10:10 PM

सुमारे ३८ हजार ६०० जागांसाठी तब्बल ३६ हजार अर्ज आल्याने वाणिज्यला प्रवेशासाठी चढाओढ पाहायला मिळेल.

ठळक मुद्देअकरावी प्रवेश : कटआॅफमध्ये विज्ञान ‘टॉप’पहिल्या फेरीत विज्ञान शाखेचे खुल्या गटाचे कटआॅफ गुण सर्वाधिक ४८८ पर्यंत कला मराठीच्या एकुण ८०६० जागांसाठी ४६९६ तर इंग्रजीच्या ५९४० जागांसाठी २३३७ एवढेच अर्जयंदाही कला इंग्रजी व मराठी माध्यमाच्या जागा निम्म्याहून अधिक रिक्त राहणार

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा वाणिज्य शाखेमध्ये प्रवेशासाठी मोठी चुरस असणार आहे. सुमारे ३८ हजार ६०० जागांसाठी तब्बल ३६ हजार अर्ज आल्याने वाणिज्यला प्रवेशासाठी चढाओढ पाहायला मिळेल. तुलनेने विज्ञान शाखेसाठी कमी अर्ज आले आहेत. मात्र, असे असले तरी पहिल्या फेरीत विज्ञान शाखेचे खुल्या गटाचे कटआॅफ गुण सर्वाधिक ४८८ पर्यंत पोहचले आहेत. विशेष म्हणजे कला शाखेच्या इंग्रजी माध्यमाचे कटआॅफही ४८४ पर्यंत गेले. त्यामुळे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी कला इंग्रजीला पसंती देत असल्याचे दिसते. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी व कट आॅफ गुरूवारी जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी दि. ६ जुलैपासून संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सुरूवात केली आहे. एकुण ७५ हजार ९३९ अर्जांपैकी ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत प्रवेशासाठी पसंती क्रमानुसार निवड झाली आहे. या फेरीमध्ये शहरातील नावाजलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ असल्याचे कटआॅफवरून दिसून येते. कटआॅफ विज्ञान शाखेचे कटआॅफ सर्वाधिक ४८८ एवढे असून वाणिज्य शाखेचे कटआॅफ ४७५ एवढे आहे. विज्ञानच्या तुलनेत वाणिज्यचा कटआॅफ कमी असला तरी अर्ज अधिक आल्याने प्रवेश सहजासहजी मिळणार नाही. पहिल्या फेरीत वाणिज्यसाठी सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अद्याप तेवढ्याच जागा शिल्लक असल्याने पुढील फेºयांमध्येही चुरस पाहायला मिळेल.यंदा कला शाखेच्या इंग्रजी माध्यमाला विद्यार्थ्यांंनी पसंती दिल्याचे दिसते. विज्ञान शाखा व कला इंग्रजीचे कटआॅफ जवळपास असून वाणिज्यला मागे टाकले आहे. मागील काही वर्षांपासून कला इंग्रजी शाखेडील कला वाढत चालला आहे. स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देणारे विद्यार्थी कला इंग्रजी शाखेत प्रवेश घेत आहेत. कला इंग्रजीच्या जागा सुमारे सहा हजार असल्या तरी अर्ज केवळ २ हजार ३३७ एवढेच आले आहेत. पण तरीही कटआॅफ अधिक लागल्याने चांगले गुण मिळालेले विद्यार्थी वाणिज्य व विज्ञान शाखेबरोबरच कला शाखेलाही पसंती देत असल्याचे दिसते. ------------------------शाखा-माध्यमनिहाय प्रवेश क्षमता व अर्ज शाखा        कला        वाणिज्य        विज्ञानमाध्यम    मराठी    इंग्रजी    मराठी    इंग्रजी    इंग्रजीप्रवेश क्षमता    ८०६०    ५९४०    १४०००    २५५६०    ३९०९०अर्ज        ४६९६    २३३७    ११६४१    २४३१५    ३२७५९----------------    

वाणिज्य शाखेचे टॉप टेन कटआॅफ गुण (खुला गट) -महाविद्यालय       कटआॅफबीएमसीसी        ४७५गरवारे        ४६७सिम्बायोसिस        ४६३अमृता         ४६१एमआयटी        ४५८सेंट उर्सुला        ४५७सर परशुरामभाऊ    ४५५विमलबाई गरवारे    ४५४एस. एम. चोक्सी    ४५३मॉडर्न         ४५१----------------------------विज्ञान शाखेचे टॉप टेन कटआॅफ गुण (खुला गट) -महाविद्यालय        कटआॅफबालवडकर         ४८८लक्ष्मणराव आपटे    ४८८श्री हरिभाऊ गिरमे    ४८३फर्ग्युसन        ४८२पी. बी. जोग        ४७९पी. जोग        ४७७डॉ. कलमाडी शामराव    ४७५मॉडर्न            ४७२एचएचसीपी        ४७२सिटी प्राईड        ४७२--------------------------------कला शाखेचे टॉप टेन कटआॅफ गुण (खुला गट) -महाविद्यालय        कटआॅफफर्ग्युसन         ४८४सिम्बायोसिस         ४७५सर परशुरामभाऊ     ४७२मॉडर्न            ४६८नौरोसजी वाडिया    ४५३सेंट मिराज        ४५२पी. जोग        ४५१फर्ग्युसन (मराठी)    ४२३डॉ. डी. वाय. पाटील    ४०३आबेदा इनामदार        ३९७    ..................यंदाही ‘कले’ची बाकडे रिकामीएकीकडे कला इंगजीचे कटआॅफ विज्ञानाशी स्पर्धा करत असले तरी उपलब्ध जागा व अर्जांमध्ये जवळपास निम्मा फरक आहे. त्यामुळे यंदाही कला इंग्रजी व मराठी माध्यमाच्या जागा निम्म्याहून अधिक रिक्त राहणार आहेत. कला मराठीच्या एकुण ८०६० जागांसाठी ४६९६ तर इंग्रजीच्या ५९४० जागांसाठी २३३७ एवढेच अर्ज प्राप्त झाले आहेत.

        

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीeducationशैक्षणिकcollegeमहाविद्यालय