शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत पोलीस कार्यालयावर ठिय्या

By admin | Updated: July 10, 2015 01:20 IST

गुनवडी (ता. बारामती) येथील माहेर असणाऱ्या धनश्री दिवेकर या विवाहित प्राध्यापिकेला पेटवून देण्यात आले.

बारामती : गुनवडी (ता. बारामती) येथील माहेर असणाऱ्या धनश्री दिवेकर या विवाहित प्राध्यापिकेला पेटवून देण्यात आले. तिच्या माहेरचे म्हणजेच बारामती तालुक्यातील गुनवडी गावातील महिला व ग्रामस्थांनी या फरारी आरोपीस अटक करावी, सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील बारामती अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. पोलिसांनी या प्रकरणात सासरे रावसाहेब नामदेव दिवेकर, पती रोहन रावसाहेब दिवेकर, सासू अरुणा रावसाहेब दिवेकर यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पती रोहन व सासू अरुणा दिवेकर यांना अटक करण्यात आली आहे. अधिक महिन्याचे वाण म्हणून माहेराहून सोन्याची अंगठी आणण्यावरून अंगावर रॉकेल ओतून पेटवण्यात आले. यात ८५ टक्के भाजून गंभीर जखमी झालेल्या धनश्रीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ ही घटना रविवारी (दि.५ ) कवठीचा मळा, वरवंड (ता. दौंड) येथे घडली. धनश्री रोहन दिवेकर (वय २५) हिने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ सासरे रावसाहेब दिवेकर फरार झाले आहेत. धनश्रीचा विवाह ३ जून २०१३ रोजी बारामती येथे झाला. या मोर्चावेळी गुनवडी ग्रामस्थांसोबत महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष सीमा चव्हाण, अनिता गायकवाड,वर्षा जोजारे, सुवर्णा जगदाळे,ज्योती जाधव या उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)आरोपी सासऱ्याला अटक या प्रकरणात फरार असलेला धनश्रीचा सासरा रावसाहेब दिवेकर याला गुरुवारी (दि.९) दुपारी अटक करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पोलीस याचा गांभीर्याने तपास करीत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.