शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

Maharashtra Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचारावर राहणार कडक ' वॉच '

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 8:50 PM

Maharashtra Election 2019 : समाजमाध्यमांसह विविध प्रकारे करण्यात येणाऱ्या प्रचारावर जिल्हा निवडणूक प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार

ठळक मुद्देशनिवारी सायंकाळपासून प्रचाराच्या तोफा थंडावल्या..वैयक्तिक समाजमाध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही एखाद्या समाजमाध्यमाद्वारे प्रचार केले जात असल्याचे आढळल्यास त्यावर कारवाई जिल्ह्यात साडेपाच कोटींची मुद्देमाल हस्तगत

पुणे : विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. समाजमाध्यमांसह विविध प्रकारे करण्यात येणाऱ्या प्रचारावर जिल्हा निवडणूक प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार आहे. आचारसंहिता काळात प्रचार करताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. या मतदान कामांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राम बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत या वेळी उपस्थित होते.जिल्हाधिकारी राम म्हणाले, शनिवारी(दि.१९) सायंकाळ सहापर्यंत जिल्हा निवडणूक शाखेकडून पूर्व परवानगी घेतलेल्या जाहीराती वर्तमानपत्रात छापता येतील. टीव्ही, जाहीर अथवा इतरपद्धतीने केला जाणारा प्रचार, समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या प्रचारावर बंदी असेल. वैयक्तिक समाजमाध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही. मात्र, एखाद्या समाजमाध्यमाद्वारे प्रचार केले जात असल्याचे आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल. येत्या विधानसभा निवडणूकीसाठी ७७ लाख २९ हजार २१७ मतदार मतदान करतील. मतदार यादीत नावे वगळली जाऊ नये याची दक्षता घेतली आहे. लोकसभा निवडणूकीत कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील दहा हजार नावे वगळल्याची तक्रार होती. या प्रकरणी सुनावणी घेऊन मतदारयादीत नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या निवडणूकीत २४ सप्टेंबर पर्यंत अर्ज कलेल्या नागरीकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. फोटो अथवा योग्य कागदपत्रे नसलेल्या ९०५ अर्जदारांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली. जिल्हा पोलीस अधिक्षक पाटील म्हणाले, जिल्ह्यातील २७६६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, दोघांवर महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस अ‍ॅ क्टीव्हीटी अ‍ॅक्ट (एमपीडीए) आणि ५ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तर, १९ टोळ्या तडीपार करण्यात आल्या आहेत. -------------------------जिल्ह्यात साडेपाच कोटींची मुद्देमाल हस्तगतजिल्ह्यात आळेफाटा ४ लाख, मंचर ३ लाख ६७ हजार, राजगड १ लाख, शिरुर ९३ हजार आणि दौंड तालुक्यातून ३० लाखांची रोकड जप्त करण्यात आली. बारामती तालुक्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणात ५.२५ कोटी रुपयांचे सोने-हिरे जप्त करण्यात आले. एका प्रकरणात साडेतीन आणि दुसऱ्या प्रकरणात पावणेदोन कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची माहिती प्राप्तीकर विभागाला दिली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाCode of conductआचारसंहिताcollectorजिल्हाधिकारीNavalkishor Ramनवलकिशोर राम