Bharat Bandh: शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी मार्केटयार्डात कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 21:27 IST2021-09-27T21:27:13+5:302021-09-27T21:27:30+5:30
दरम्यान, परराज्यातून काही फळांच्या गाड्या आल्या होत्या, त्यांना बंदबाबतची माहिती उशिरा मिळाली होती. मात्र, माल उतरून घेण्यात आला आहे. त्याची विक्री दुसऱ्या दिवशी करण्यात येणार

Bharat Bandh: शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी मार्केटयार्डात कडकडीत बंद
पुणे : केंद्र शासनाने मांडलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. साधारण आठ महिन्यांपासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी २७ तारखेला देशव्यापी बंदचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. या बंदमध्ये मार्केट यार्डातील सर्व संघटना, बाजार घटकांनी सहभाग नोंदवत कडकडीत बंद पाळला. तसेच बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा विविध संघटनांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, परराज्यातून काही फळांच्या गाड्या आल्या होत्या, त्यांना बंदबाबतची माहिती उशिरा मिळाली होती. मात्र, माल उतरून घेण्यात आला आहे. त्याची विक्री मंगळवारी (दि़. २८) करण्यात येणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत, तोलणार संघटना, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, टेम्पो पंचायत मार्केटयार्ड, भारतीय कामगार सेना आणि महाराष्ट्र टेम्पो संघटनांनी बंद जाहीर केला होता. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने त्याला पाठिंबा दिला.
आवक ठप्प; व्यापाऱ्यांचाही उत्स्फूर्त पाठिंबा
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, केळी व पान बाजार, तसेच फुलबाजारात आवक ठप्प झाली होती. भुसार बाजारातीलही बहुतांश दुकाने बंद होती, तर काही दुकानांत व्यवहार सुरू होते. बंदला पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांनीही सर्व व्यवहार बंद ठेवले होते.