शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Maharashtra Elections 2019 : बारामती विभागात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:24 PM

Maharashtra Vidhan Elections 2019 : आठ ठिकाणी नाकेबंदी : १ हजार ८५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई;

ठळक मुद्दे३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बारामती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती उपविभागात आठ ठिकाणी नाकेबंदी सुरू आहे.  नाकेबंदी पथकात एक अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नाकाबंदीसाठी ३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सांगवी पूल (बारामती तालुका पोलीस ठाणे), गुंजखेडा (वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे), भवानीनगर (कारखान्यासमोर), कळंब (इंदापूर), सरडेवाडी टोलनाका (इंदापूर), सराटी (इंदापूर), कर्जत-जामखेड रोड (भिगवण), पुणे-सोलापूर महामार्ग (इंदापूर) या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.बारामती, इंदापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील १८५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून त्यांच्याकडून निवडणूककाळात कोणताही गैरप्रकार होणार नाही, वर्तणुकीबाबत यासंदभार्तील लेखी हमीपत्रही घेण्यात आले आहे. त्यांच्यावर कलम १०७, १०९, ११०, १४९ अन्वये कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती उपविभागातील पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक, तडीपारी, मोक्का अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.............कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान निर्माण करणाºया २१३ जणांवर बारामती उपविभागातील हद्दीतील पोलिसांनी  तडीपारीची कारवाई केली आहे. हाणामारी, जीवे मारण्याचा प्रयत्न, खून यांसारख्याशरीरविषयक गुन्ह्यांसह मालमत्तेसंबंधीच्या गुन्ह्यांमध्येही सक्रिय असणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र,संबंधितांचा मतदानाच्या दिवशी मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कलम ५५, ५६, ५७ नुसार २२ जणांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.मतदान दिवशी नागरिकांना त्याचा मतदानाचा हक्क बजावताना कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी ३६ पथके तयार केली आहे. त्यामध्ये १६ बारामती विधानसभा मतदारसंघात, तर २० इंदापूर मतदारसंघात पथके काम करणार आहे. त्यासाठी ३६ पोलीस अधिकारी, १४४ कर्मचारी, ७२ होमगार्डची नेमणुका केल्याची माहिती प्रशासनाने दिली. ......बारामती उपविभागात बारामती, इंदापूर या दोन विधानसभांचा समावेश आहे. दोन्ही विधानसभांमध्ये ६९६ बूथ आहेत. यामध्ये ९५ बारामती शहर, १२२ बारामती तालुका, १५० वडगाव निंबाळकर, १६३ इंदापूर, ३५ भिगवण, १३१ वालचंदनगरचा समावेश आहे. तर दोन्ही विधानसभा मतदारसंघात २० बारामती, १५ इंदापूर संवेदनशील मतदार बूथचा समावेश आहे. 

टॅग्स :baramati-acबारामतीElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारणMONEYपैसाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019