शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Uday Samant: मराठी माणसाला मारहाण करणाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त केला जाईल - उदय सामंत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:15 IST

महाराष्ट्रात उद्योगांना कुणी त्रास देत असेल तर त्यावर कारवाई करू. सर्व उद्योगांना संरक्षण देण्याचे आमचं काम आहे

पुणे : कल्याणमध्ये  एका मराठी कुटुंबाला अमराठी माणसाने बेदम मारहाण केल्याचं प्रकरण समोर आल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. मुंबईत, महाराष्ट्रात राहूनही मराठी माणसांना अतिशय तुच्छ वागणूक देणारे अनेक प्रकार यापूर्वीही घडले असून असाच प्रकार पुन्हा घडल्याने मराठी माणूस महाराष्ट्रातच असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाचे अधिवेशनातही पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाबाबत कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तर अशा लोकांचा कडेकोट बंदोबस्त केला जाईल असा इशारा उदय सामंत यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिलाय. मराठी माणसाला जर मारहाण होत असेल तर कारवाई करू. महाराष्ट्र सगळ्या जातींना घेऊन चालणारे राज्य असल्याचे ते यावेळी सांगितले आहे.  

महाराष्ट्रातील उद्योगाबाबत बोलताना सावंत म्हणाले, महाराष्ट्रात उद्योगांना कुणी त्रास देत असेल तर त्यावर कारवाई करू. सर्व उद्योगांना संरक्षण देण्याचे आमचं काम आहे. राज्यभर उद्योग भवन उभारण्याचं काम हाती घेणार आहोत. गडचिरोली सारख्या जिल्हयात अनेक कंपन्या आणल्या. मराठवाड्यात देखील अनेक गुंतवणुकी आम्ही आणल्या आहेत. संभाजी नगरध्ये अनेक प्रकल्प आम्ही आणले  आहेत. माझ्या मतदार संघात देखील एक मोठा कारखाना येत आहे. त्याचं काम सूरू झालं आहे. पुणे, गडचिरली, रत्नागिरी, कल्याण डोंबिवली या जिल्ह्याला टाटा समूहाकडून सीआरएसमधून ५०० कोटी रुपयांचे प्रकल्प होत आहेत. 

उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत. या विरोधकांच्या वक्तव्यावर सामंत यांनी यावेळी निशाणा साधला. ते म्हणाले, विरोधकांनी फेक नऱ्हेटिव सेट केला होता. उद्योग कुठलेच राज्याबाहेर गेले गेले नाहीत. त्यांच्या काळात काम झाल नाही. म्हणुन हे प्रकल्प बाहेर गेले. चर्चा न झाल्याने त्यांच्या काळात एयर बस हा प्रकल्प गेला. याबाबत व्हाईट पेपर का काढला नाही असं सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.  

आमच्या अनेक मंत्र्यांना बंगले दिले गेले आहेत. आणि फ्लॅट सुद्धा दिले गेले आहेत.आमच्या मध्ये बंगल्यावरून वाद होणारं नाही हे नक्की आहे. शिवसेना पुणे महानगरपालिकेत सत्तेत येईल असेच काम करू. पुण्याचा महापौर आमच्या विचाराशिवाय होणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तानाजी सावंत मला सिनियर आहेत. मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतील त्यांची नाराजी नक्की दूर करू आमचं कुटुंब आहे. एकनाथ शिंदे कुटुंबप्रमुख आहेत बीड आणि परभणी बद्दल बाकीच्यांचं मला माहिती नाही. आम्हीं शेवटच्या आरोपींपर्यंत पोहोचू, त्यांना नक्की न्याय मिळेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. 

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाmarathiमराठीMaharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसायMONEYपैसा