शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नीरा शहरात तणाव

By admin | Updated: August 24, 2015 02:45 IST

नीरा येथे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य विराज काकडे, नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, विद्यमान उपसरपंच दीपक काकडे यांच्यासह आणखी

नीरा : नीरा येथे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य विराज काकडे, नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, विद्यमान उपसरपंच दीपक काकडे यांच्यासह आणखी दोघांना जमावाने मारहाण केली. ही घटना सायंकाळी ६.३० च्या सुमारास अहिल्याबाई होळकर चौकात घडली. या प्रकारामुळे नीरा शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन प्रमुख बाजारपेठ तत्काळ बंद पडली होती.नीरा ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. याचे पडसाद या घटनेवरून दिसून आले. जि. प. सदस्य विराज काकडे, नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे व विद्यमान उपसरपंच दीपक काकडे यांच्यासह दोघांवर पाच- सहा जणांच्या जमावाने अचानक हल्ला करून मारहाण केली. यामध्ये विकास आघाडीचे हे तिघे नेते जखमी झाले आहेत. नीरा शहराच्या प्रमुख बाजारपेठेच्या होळकर चौकात ही घटना घडल्यानंतर तत्काळ दुकाने बंद केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनस्थळी जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, प्रमोद काकडे यांनी घटनास्थळी येऊन काकडे गटाच्या समर्थकांना शांत करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. दरम्यान, काकडे गटाच्या समर्थकांनी आरोपीच्या अटकेसाठी होळकर चौकात बराच वेळ ठिय्या मांडला होता. रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक अशोक भरते यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेसंदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार पोलिसांकडे दाखल नव्हती. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नीरा शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. (वार्ताहर)