शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक भेटीगाठींमुळे आलेला ताण, थकवा हे मुख्य कारण; शरद पवारांना पुढील २ दिवसांत डिस्चार्ज देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:32 IST

अलीकडील व्यापक दौरे, प्रवास आणि वारंवार होणाऱ्या सार्वजनिक भेटीगाठींमुळे आलेला शारीरिक ताण व थकवा हे या त्रासाचे मुख्य कारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यात सातत्याने सुधारणा होत आहे. त्यांचे सर्व जीवनावश्यक घटक (वायटल पॅरामीटर्स) सामान्य मर्यादेत असून त्यांची एकूण क्लिनिकल स्थिती स्थिर आणि दिलासादायक असल्याची माहिती  रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट यांनी दिली आहे. 

रुग्णालयात दाखल होताना आढळलेली छातीतील कोंजेशन (कफ साचणे) उपचारांना अत्यंत चांगला प्रतिसाद देत असून प्रकृतीत सुरळीत सुधारणा होत आहे. अलीकडील व्यापक दौरे, प्रवास आणि वारंवार होणाऱ्या सार्वजनिक भेटीगाठींमुळे आलेला शारीरिक ताण व थकवा हे या त्रासाचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वैद्यकीय देखरेखीखाली पवार यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. सध्याच्या प्रगतीचा आढावा घेत, पुढील दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचे नियोजन वैद्यकीय पथकाकडून करण्यात येत आहे, अंतिम निर्णय त्यांच्या प्रकृतीतील सातत्यपूर्ण सुधारणा लक्षात घेऊन घेतला जाईल असे त्यांनी सांगितले आहे. 

दरम्यान राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याच्या कारणास्तव सोमवारी (दि. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी रुबीचे संचालक डॉ. सायमन ग्रॅण्ट यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत काही चाचण्या सामान्य असल्याचे निदर्शनास आले असून, शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर