शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

एका 'हटके' लग्नाची गोष्ट! रक्तदानाचं श्रेष्ठ कर्तव्य बजावत वधूवरांनी बांधली रेशीमगाठ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 21:50 IST

दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथे पार पडलेल्या लग्नात अ अनोख्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपली गेली...

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्नासह सर्वच समारंभांना मर्यादा आल्या आहेत. तरीदेखील काही लग्नसोहळे हे विशेष ठरताहेत. दौंड तालुक्यातील देऊळगाडा येथील लग्न सध्या परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या लग्नात नवरदेव नवरीने भर मंडपात रक्दान करून समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे.एवढेच नव्हे तर आपल्यासोबत गावातील तरुणांना देखील सहभागी करून घेत रक्तदानाची अनोखी मोहीम देखील राबविली. 

दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा गावचे रहिवासी असलेल्या मारूती कोकरे यांचे सुपुत्र अंकुश व माळशिरस तालुक्यातील कुरबावी येथील गोरख रूपनवर यांची कन्या पूनम यांचा लग्नसोहळा मोजक्याच पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.पण काळाची गरज ओळखून नवरदेव मुलाने आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करताना लग्नसमारंभात सामाजिक बांधिलकी जपण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच ही इच्छा अगोदर त्याने आपल्या वडिलांसह कुटुंबासमोर सांगितली. या नेमकं काय करता येईल याचा चोहोबाजूंनी विचारविनिमय केल्यानंतर कुठलाही बडेजाव ना करता साध्या आणि सोप्या लग्नसोहळ्यात रक्तदान शिबीर आयोजित करण्याचं ठरले. 

कोरोना संकटामुळे राज्यात ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा कमतरता भासत आहे.त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक जणांनी नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले आहे. रक्तदानाची हीच गरज ओळखून पैलवान आणि फार्मसिस्ट असणाऱ्या अंकुशने आपल्या लग्नात सकाळपासूनच रक्तदान शिबिराचे आयोजन केले. तसेच गावातील तरुणांना व कुटुंबातील लोकांना देखील रक्तदानासाठी प्रवृत्त केले. एवढेच नाहीतर त्याने आपल्या लग्नात अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग केला. आणि अक्षतांसाठी वापरण्यात येणारा सर्व तांदूळ बारामती तालुक्यातील सुपे येथील विशेष मुलांच्या संस्थेला व दौंड तालुक्यातील गलांडवाडीमधील खाडे बालकाश्रमाला सुपूर्द करण्यात आला. या लग्नसोहळ्याला उपस्थित असणाऱ्या पाहुणे मंडळींना आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आली. 

नवरदेव अंकुश म्हणाला,मला माझे लग्न अनेक सामाजिक उपक्रमांनी पार पाडायचे होते. आणि या सगळ्यात माझ्या कुटुंबाची साथ महत्वाची होती. पण कुटुंबाने समाजाचा विचार न करता माझ्या पाठीशी उभे राहिले.एकतर आमच्या धनगर समाजात परंपरेला मोडीत काढणे फार अवघड गोष्ट आहे. मात्र कुटुंब पाठीशी असल्याने मी निश्चिन्त होतो. त्याचवेळी समाजातील रक्ताच्या तुटवड्याच्या बातम्या कानावर येत होत्या. त्यामुळे लग्नात देखील रक्तदानाची मोहीम राबविण्याचे ठरवले.  हा उपक्रम सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. 

........प्री वेडिंगसाठी आयडियाची कल्पना अलिकडे प्री वेडिंग फोटोशूट या नवीन संकल्पनेचा सर्वत्र बोलबाला आहे. यासाठी अनेकजण अप्रतिम ठिकाणे निवडतात. मात्र अंकुश आणि पूनम यांनी सगळ्याला फाटा देत आपले प्री वेडिंग फोटोशूटसाठी हटके आयडियाची कल्पना वापरली. यात त्यांनी धनगर समाजाच्या परंपरागत वेशभूषेत आणि मेंढरांसमवेत प्री  वेडिंग फोटोशूट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नBlood Bankरक्तपेढीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस