शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

न्हावरेत पाण्यासाठी रास्ता रोको!

By admin | Updated: August 22, 2015 02:02 IST

न्हावरेसह परिसरातील १४ गावांच्या शेती तसेच पिण्यासाठी चासकमान कालव्याच्या पाण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन न केल्याने

न्हावरे : न्हावरेसह परिसरातील १४ गावांच्या शेती तसेच पिण्यासाठी चासकमान कालव्याच्या पाण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन न केल्याने आवर्तन सुटून एक महिना होत आला, तरी शिरूरच्या पूर्व भागाला अद्याप पाणी मिळाले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध करून सुमारे तासभर न्हावरे (ता. शिरूर) येथील शिरूर-चौफुला राज्यमार्ग रोखला व रास्ता रोको आंदोलन केले.साधारणपणे चासकमानच्या कालव्याचे आवर्तन सोडून २४ दिवस झाले, तरी शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात अद्याप पाणी पोहोचले नाही. यामुळे ऐन बहरात आलेली पिके पाण्याअभावी जळून गेली. सुरू असलेले अवर्तन सोडताना ते टेल भागाकडून सोडण्यात येईल, अशी घोषणा संबंधित लोकप्रतिनिधी व चासकमानच्या अधिकाऱ्यांनी केली होती; मात्र या भागात आवर्तन सोडताना अधिकाऱ्यांनी घेतलेल्या अन्यायकारक भूमिकेमुळे या भागात पिकांच्या झालेल्या नुकसानाला चासकमाने अधिकारी, कर्मचारी जबाबदार असून त्याची भरपाई संबंधितांनी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी करीत आंदोलक शेकऱ्यांनी चासकमानच्या अधिकाऱ्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.या प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र कोरेकर, जिल्हा परिषद सदस्य मनीषा कोरेकर, घोडगंगाचे संचालक प्रा. गोविंदराजे निंबाळकर, रवी काळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, बाळासाहेब कोरेकर, माजी सरपंच अतुल बेंद्रे, महादेव जाधव, पोपटराव थिटे, माजी उपसरपंच अशोक कोळपे, गोपाळ हिंगे, बापू काळे, दिलीप बेंद्रे, दत्तात्रय निंबाळकर, प्रकाश बहिरट, सुभाष कोकडे आदी परिसरातील १४ गावांचे शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी आंदोलन स्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या बेदखल कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)