शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोमाटणे नाक्यावरील टोल रोखला

By admin | Updated: June 9, 2015 05:47 IST

मुदतीत काम सुरु न केल्याने तसेच कामाचे आदेश मिळाले नसल्याचा दावा संबंधित ठेकेदाराने केल्याने सोमवारी देहूरोडच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सोमाटणे टोल नाक्यावरील टोलवसुली बंद पाडली.

किवळे : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्त्याच्या संरक्षक बाजूपट्ट्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणाबाबत बैठकीत इशारा देऊन मुदतीत काम सुरु न केल्याने तसेच कामाचे आदेश मिळाले नसल्याचा दावा संबंधित ठेकेदाराने केल्याने सोमवारी देहूरोडच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी, आमदार संजय भेगडे व विशाल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत सोमाटणे टोल नाक्यावरील टोलवसुली बंद पाडली. देहूरोड येथील झालेल्या संयुक्त बैठकीत इशारा दिल्यानुसार, खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास देहूरोड मुख्य बाजारपेठेतून दुचाकी रॅली काढून सोमाटणे टोलनाक्यावर साडेदहाच्या सुमारास दाखल झाले. आयआरबी व विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या धिक्काराचे फलक दाखवीत घोषणा देत टोलनाक्यावर आंदोलन सुरू केले. त्यामुळे सुमारे अर्धा तास रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी अकराच्या सुमारास आमदार भेगडे यांनी आंदोलनात सहभागी होत वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहने टोल न घेता पुढे जातील, अशी घोषणा केल्याने सर्व वाहने टोल न भरता पुढे सोडण्यात आली.(वार्ताहर)टोलवसुली सुरूसायंकाळी तळेगाव पोलीस ठाणे येथे बैठकीनंतर टोल वसुलीला परवानगी देण्यात आली. सुमारे तासभर टोलवसुली बंद होती. आमदार बाळा भेगडे, भाजप तालुकाध्यक्ष रामनाथ वारिंगे, भाजयुमाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वारिंगे, प्रशांत ढोरे, नगरसेवक चंद्रभान खळदे, गणपतराव काळोखे, जयंत कदम आदी उपस्थित होते. मंगळवारी सकाळी मंत्रालयात (मुंबई) निगडी-देहूरोड टप्प्यातील संपूर्ण कामाचे आदेश देण्याबाबत उद्यारस्ते विकास मंत्रालयाचे सहसचिव अनिल डिग्गीकर, आरआरबी अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार असल्याचे आमदार भेगडे यांनी सांगिंतले.--------------------------देहूरोड ते निगडी रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याने येत्या दोन महिन्यांत चौपदरीकरण कामाला व उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. संबंधित रस्त्याच्या बाजूपट्ट्या खचल्याने वारंवार अपघात होत असल्याने गेल्या आठवड्यात देहूरोड येथे झालेल्या संयुक्त बैठकीत बाजूपट्ट्यांचे चार दिवसांत मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याबाबत इशारा देण्यात आला होता. मुदतीत काम न झाल्याने सोमवारी सोमाटणे येथील टोल वसुली थांबविली आहे. नाक्याला टाळे ठोकण्यात आले असून चाव्या माझ्याकडे राहणार आहेत. आरआरबीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी भूमिका स्पष्ट करावी. - संजय भेगडे, आमदार ----------------------------पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे देहूरोड ते निगडी दरम्यान देहूरोड बाजारभागातील फक्त सातशे मीटर लांबीच्या बाजूपट्ट्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे आदेश दिले असून, उर्वरित सुमारे साडेपाच किलोमीटर कामाबाबत आमदार भेगडे, महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट कंपनी या ठेकेदार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार असून, त्यात उर्वरित कामाच्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.- संजय गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, मुंबई