शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या पाणी प्रश्नावरून इंदापूरात शेतकरी रस्त्यावर, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 16:34 IST

"कोण म्हणत पाणी देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही" अशी भुमीका घेत केला सोलापूरच्या नेत्यांचा निषेध

ठळक मुद्देपाण्यासाठी विरोध करणार्‍यांना भविष्यात इंदापूर तालुक्यातील शेतकरी जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत

बाभुळगाव: उजनीचा पाणी प्रश्न गेल्या महिन्यापासून मिटायचे नाव घेत नाही. त्यामुळे इंदापूरसोलापूर मधील शेतकर्‍यांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर शेतकऱ्यांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे

"कोण म्हणत पाणी देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही" अशी भुमीका घेत सरडेवाडी येथील पूणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकरी कती संघर्ष समीतीच्या शेतकर्‍यांनी सोलापूरच्या नेत्यांचा निषेध नोंदवला आहे.    वाटेल ती किंमत मोजू पण पंधरा दिवसात इंदापूर तालुक्याला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. परंतु सोलापूर जिल्ह्यातून इंदापूरच्या पाच टीएमसी पाण्याला विरोध झाला. त्यामुळे शासनाला पाणी वाटपाचा आदेश रद्द करावा लागला. पाण्यासाठी विरोध करणार्‍यांना भविष्यात इंदापूर तालुक्यातील शेतकरी जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. असेही समितीने सांगितले.  

पाणी प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयाचा फेर विचार करावा. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न मिटणार आहे. उजनी धरणाची निर्मिती होताना इंदापूर तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांनी आपल्या हजारो एकर शेत जमीनींचा त्याग केला आहे. पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात फीरकु न देण्याची भाषा सोलापूरातील काही नेतेमंडळी करत आहेत. परंतु तसे घडल्यास इंदापूर तालुक्यातील शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील एकाही नेत्याची गाडी भिमानगर पुलाच्या अलीकडे येऊ न देता, जशास तसे उत्तर दिले जाईल. असे इंदापूर तालुका शेतकरी संघर्ष कृती समीतीकडून सुचित करण्यात आल्याने पाणी प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूरSolapurसोलापूरWaterपाणीDamधरण