शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ऑनलाईनचा खेळ आता बास! राज्यातील ५ लाख ६० हजार पालकांचा शाळा सुरू करण्यास होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 15:33 IST

नववी-दहावीचे वर्ग सुरु करण्यासाठी पालकी आग्रही; एससीईआरटीचे सर्वेक्षण 

पुणे : कोरोनामुळे राज्यातील बंद असलेल्या शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी)केलेल्या सर्वेक्षणात ५ लाख ६० हजार ८१८ (८१.१८ टक्के) पालकांनी शाळा सुरू करण्यास होकार दर्शविला आहे. त्यात राज्यातील नववी व दहावीच्या सर्वाधिक २ लाख ८६ हजार ९९० पालक शाळा सुरू करण्यास आग्रही असल्याचे दिसून येत आहे.अनेक पालक शाळा सुरू करण्यास अनुकुल असल्याने राज्यातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एससीईआरटीच्या सर्वेक्षणात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ७३ हजार ८३८ पालकांनी सहभाग घेतला आहे. तर मुंबई (बीएमसी) मधील ७० हजार ८४२ आणि मुंबई (डीवायडी)मधील ३९ हजार ३५१ पालकांनी सर्व्हेक्षणात सहभाग नोंदवला.सर्वेक्षणात राज्यातील एकूण ८१.१८ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्यास होकार दर्शविला असला तरी १ लाख ३० हजार २ (१८.८२ टक्के) पालकांचा शाळा सुरू करण्यास अजूनही विरोध आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील कोरोना मुक्त ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग येत्या १५ जुलैपासून सुरू करण्याबाबत एससीईआरटीतर्फे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. सोमवारी रात्री ११.५५ वाजेपर्यंत या सर्वेक्षणात सहभाग घेण्यास मुदत देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी या सर्वेक्षणांत मत नोंदवले. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागातील प्रत्येकी ३ लाखाहून अधिक पालकांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. त्यामुळे अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठवण्यास अनुकुल असल्याचे दिसून येत आहे. परंतु,शासन शाळा सुरू करणार की नाही, हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे. -------------------विद्यार्थी सुमारे दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना डोळ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे आता शासकीय नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या पाहिजे. शासनाने प्रत्येक शाळेसाठी लसीकरणासाठी वेगळी तरतुद केली पाहिजे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करायाल हवेत. स्थानिक प्रशासनाने सुध्दा शाळा सुरू करण्याबाबत साकारात्मक भूमिका घ्यायला हवी.- दिलीप सिंग विश्वकर्मा,अध्यक्ष, महापॅरेंटस------------------------कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या किती पालकांनी नोंदवले मत   नर्सरी :  १९,२७३ पहिली ते पाचवी : १,६२,१८४ सहावी ते आठवी : २,१५,५९० नववी ते दहावी : २,८६,९९० अकरावी ते बारावी : १,०५,३९२ --------------सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या राज्यातील पालकांची आकडेवारी   अहमदनगर - ३४,०६७, अकोला - ८,६७८, अमरावती -१६,०५१, औरंगाबाद - १२,९८८, बीड -११,०९६ , भंडारा -६,१९७, बुलढाणा -१४,०७१, चंद्रपूर -१२,८२२,  धुळे - ८,०३२, गडचिरोली - ३,१३१ , गोंदिया ६,७३५, हिंगोली -४७१०, जळगाव -१८,७८०, जालना- ८,५८१, कोल्हापूर-३०,४३७ , लातूर १०३०२, मुंबई (बीएमसी) -७०,८४२, मुंबई (डीवायडी)-३९,३५१,  नागपूर-१६,४४० , नांदेड - १०,६५१, नंदूरबार -४,४८४, नाशिक -४७,२०२, उस्मानाबाद ८०१३, पालघर - २३,३३९, परभणी - ६,६०९, पुणे- ७३,८३८ , रायगड - १६,६५८ , रत्नागिरी- १३,९६९, सांगली-१७,८३३, सातारा -४१,२३३, सिंधूदूर्ग- ६,८०४ , सोलापूर - २२,२५४, ठाणे -३९,२२१, वर्धा- १०,९९१, वाशिम-५,३७२, यवतमाळ - ९,०२९---- निवासस्थानाची माहिती देऊन सर्वेक्षणात भाग घेणारे पालक ग्रामीण  - ३,०५,२४५निमशहरी -७१,९०४ शहरी - ३,१३,६६८एकूण - ६,९०,८२०--------- 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीonlineऑनलाइन