शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

घरकाम थांबव...तुझा धर्म वेगळा आहे; 'सुशिक्षित' मालकीण बाईंचा 'अशिक्षित'पणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 18:41 IST

चार मुलींचा सांभाळ, आईचे आजारपण, नवऱ्याचा अनियमित मिळणारा पगार अशा अनेक कटकटीकटींना तोंड देत चार ठिकाणी घरकाम करणारी ती...

ठळक मुद्देकोरोनापासून आपण काहीच शिकणार नाही का?

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : चार ठिकाणी घरकाम करून संसाराचा डोलारा सांभाळणारी ती... वय 30 वर्षे... पदरी चार मुली... नवरा दुसऱ्या गावी कापडकाम करणारा कारागीर... परवा एका मालकिणीने फोन करून सांगितले की, 'लॉकडाऊन संपले तरी यापुढे कामाला येऊ नकोस'... मोठे काम सुटणार, या टेन्शनने तिने कारण विचारले... समोरून उत्तर आले, 'तू विशिष्ट धर्माची आहेस म्हणून'...!

एकीकडे कोरोना विषाणू देश, भाषा, जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदाभेद न करता सर्वत्र झपाट्याने पसरतो आहे आणि या भयाण संकटातही माणसाच्या मनातील जाती-भेदाच्या भिंती तुटायला तयार नाहीत. सुशिक्षित लोक सुधारणांचा लवकर स्वीकार करतात, असे गृहितक नेहमीच मांडले जाते. पण, आजही अशी उदाहरणे समोर आली की यातील फोलपणा लक्षात येतो आणि समाज अजून सुधारलेला नाही, यावर शिक्कामोर्तब होत जाते.

मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली. महिन्याभरातच कोरोनाबधितांची संख्या हजारोंच्या घरात जाऊन पोहोचली. एकीकडे सरकार सामान्यांना आवाहन करत कोरोनाशी लढा देत आहे, 'घरीच थांबा, सुरक्षित रहा' असे सांगत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार असे अनेक घटक रात्रंदिवस झटत आहेत. अशा वेळी समाजातील सर्व घटकांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी धार्मिक तेढ निर्माण करणारी अशी उदाहरणे अस्वस्थ करणारी ठरत आहेत.

'लोकमत'शी बोलताना 'ती' म्हणाली, 'हात आणि पोटाची लढाई लढताना धर्माचा केव्हाच विसर पडला आहे. लहानपणापासून गरिबीशी कायमचीच मैत्री झाली. चार मुलींचा सांभाळ, आईचे आजारपण, नवऱ्याचा अनियमित मिळणारा पगार अशा अनेक कटकटी पाठलाग करतात. नवऱ्याचा कामातील प्रामाणिकपणा पाहून कापडमालक त्याला घेऊन दुबईला गेला आणि काही दिवसातच कोरोना आला. नवऱ्याचे तिकडे भयंकर हाल सुरू आहेत. मी चार-पाच ठिकाणची घरकामे करून घरची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद झाली. एका दुकानतले आणि एका पार्लरमधले साफसफाईचे काम आपोआपच बंद पडले.  एका मालकिणीच्या घरी धुणे, भांडी, केर, फरशी अशी चार कामे करत होते. दोन-अडीच हजार रुपये मिळत होते. त्या बाईने फोन करून सांगितले की आता तू लॉकडाऊन संपले तरी कामाला येऊ नकोस, कारण तू विशिष्ट धर्माची आहेस.'

ती म्हणाली, 'कोरोनामुळे आधीच खूप अडचणी आल्या आहेत. रेशनचे धान्य अजून मिळालेले नाही. मी एका विशिष्ट धर्माची आहे यात माझा दोष आहे का? रोग धर्म-जात पाहून होतो का?' मी राहात असलेल्या भाड्याच्या घरातून मला काढून टाकावे, असे आजूबाजूच्या लोकांनी घरमालकिणीला सांगितले. पण ती मनाने चांगली असल्यामुळे तिने कोणाचे काही ऐकले नाही आणि लगेच भाड्याचे पैसे दे, म्हणून मागेही लागलेली नाही.'

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWomenमहिला