शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील सीमाभिंत पाडण्याचे काम रोखले

By admin | Updated: March 28, 2015 00:58 IST

विठ्ठलवाडी ते वारजे दरम्यान नदीपात्रात बांधण्यात आलेला रस्ता व सीमाभिंत उखडण्यास महापालिकेतर्फे शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली.

पुणे : विठ्ठलवाडी ते वारजे दरम्यान नदीपात्रात बांधण्यात आलेला रस्ता व सीमाभिंत उखडण्यास महापालिकेतर्फे शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. मात्र तेथील रहिवाशांनी पालिकेच्या या कारवाईला विरोध केल्याने काम थांबविण्यात आले. नदीपात्रातील सीमाभिंत न पाडता केवळ रस्ता काढावा, अशी मागणी येथील रहिवाशांची आहे.सिहंगड रस्त्यावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून विठ्ठलवाडी ते वारजे दरम्यान नदीपात्रात अडीच किलोमीटरचा रस्त्या बांधण्यात आला. तसेच पुराचे पाणी नदीलगतच्या इमारतींमध्ये घुसू नये यासाठी सिमेंट काँक्रीटची भिंतही उभारण्यात आली आहे. मात्र, काही पर्यायवरणप्रेमींनी त्याविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. लवादाने रस्ता उखडण्याचा निर्णय दिल्यानंतर या आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी पालिकेतर्फे सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले. न्यायालयाने लवादाचा निर्णय कायम ठेवल्याने शुक्रवारपासून पालिकेतर्फे रस्ता उखडण्याचे काम सुरू करण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास पालिकेचे अधिकारी यंत्रांसह नदीपात्रात दाखल झाले. भिंत पाडण्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर माजी नगरसेवक शैलेश चरवड, परिसरातील एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष हेमंत जगताप यांच्यासह रहिवाशांनी एकत्र येत त्याला विरोध केला. रहिवाशांनी जोरदार विरोध केल्याने शुक्रवारी भिंतीचा काही भाग पाडून काम थांबविण्यात आले. जगताप म्हणाले, रस्ता उखडण्यास आमचा विरोध नाही. मात्र सीमाभिंत व भराव काढल्यास परिसरातील सोसायट्यांना पुन्हा पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत सोमवारी महापौर व आयुक्तांना भेटणार आहोत. काम चालूच राहणारसर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याने रस्ता उखडण्याचे काम सुरूच ठेवले जाईल. तेथील रहिवाशांशी याबाबत चर्चा केली जाईल. त्यांना आदेशाबाबत समजावून सांगून त्यांच्या मनातील भीती घालविण्याचा प्रयत्न करू. काम खूप मोठे असल्याने वेळ लागेल. पण आदेशानुसार नदीपात्रातील बांधकाम काढावेच लागणार आहे.- विवेक खरवडकर, अतिरिक्त नगर अभियंता, महापालिका