शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मानधनाअभावी होडी बंद

By admin | Updated: June 17, 2015 23:22 IST

वहानगाव ते माळेगावच्या दरम्यान ठोकळवाडी जलाशयातील ‘नाव’(होडी) सेवा नावाड्याअभावी बंद आहे. मागील पाच वर्षांपासून वारंवार

कामशेत : वहानगाव ते माळेगावच्या दरम्यान ठोकळवाडी जलाशयातील ‘नाव’(होडी) सेवा नावाड्याअभावी बंद आहे. मागील पाच वर्षांपासून वारंवार नावाड्याच्या मानधनाचा प्रश्न पुढे येऊनही सेवा खंडित होत आहे.सन १९२२ च्या सुमारास दि टाटा पॉवर सप्लाय कंपनीने वीजनिर्मितीसाठी इंद्रायणीनदीवर वडेश्वर गावाजवळ ठोकळवाडी धरण बांधले. आंदर मावळातील सह्याद्री डोंगर पठार आणि शिवारातील पाण्याच्या धरणात साठा वाढला. या पाण्यावर भिवपुरीजवळ टाटाचा वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला. या विजेवर मुंबई शहराला वीजपुरवठा होत आहे.धरणातील पाणीसाठ्यामुळे आंदर मावळातील पश्चिम भागातील धरणाच्या अलीकडे आणि पलीकडे अशा दोन भागांत विभागणी झाली. वडेश्वर, सटवाईवाडी, शिंदेवाडी, घाटेवाडी, वहानगाव, नागायली, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहुली, बेंदेवाडी, कुसुर या गावांना धरणापलीकडील माळेगाव, परी, तळपेवाडी, माळेगाव बुद्रुक, कुणे, अनसुटे, पारीठेवाडी, इंगळुण या गावांना जोडण्यासाठी माळेगाव ते वहानगाव दरम्यान नावेची व्यवस्था करण्यात आली.या गावातील सोयरसंबंध आणि नातीगोती या नावेतील रेशमगाठीने अधिक घट्ट झाली. माहेरवासीण सुना, लेकी अलीकडे पलीकडे जाऊ लागल्या. सुख-दु:खाला सोयरे धावू लागले. वीस वर्षांपूर्वी आंदरमावळ सहकारी दूधउत्पादक संस्थेला होणारा धरणापलीकडील दूधउत्पादकांचा दूधपुरवठा याच नावेतून होत होता, तर वरसुबाई या देवस्थानाच्या दर्शनासाठी शेकडो भाविक याच नावेतून प्रवास करून जात होते.नावाड्याच्या तीन पिढ्या नावेवर राबत होत्या. कै. रूपा शिवा बोऱ्हाडे यानंतर त्यांचा मुलगा कै. चंदर रुपा बोऱ्हाडे आणि आता नातू मारुती चंदर बोऱ्हाडे नाव चालवत आहेत. यापैकी रुपा बोऱ्हाडे आणि चंदर बोऱ्हाडे यांना जिल्हा परिषदेच्या कामगारांच्या दर्जानुसार मानधन दिले जायचे. यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता.सकाळी सात ते सायंकाळी सात अशा बारा तास बोऱ्हाडे कुटुंबीय या परिसरातील प्रवाशांची सेवा करीत होते. या नावेतूनच लग्नाचे वऱ्हाड त्यांनी पाहिले. प्रसूतीसाठी महिला नावेत बसून वडेश्वरला रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. अंत्यविधी, दशक्रिया, बारसे, यात्रा, जत्रा या समारंभाला नागरिकांचे येथे जाणे होते.मात्र चंदर बोऱ्हाडे यांच्या मृत्यूनंतर नावाड्याच्या मानधनावरून प्रश्न निर्माण होऊन काही काळ जि. प. येथे शासकीय लाँच ठेवली. मात्र त्यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागली. तेही स्थानिक नसल्याने कधी वेळेवर पोहोचत नव्हते. लाँच बंद पडून पुन्हा नव्याने नावेची व्यवस्था झाली. मात्र, नावाड्याच्या मानधनाचा प्रश्न पुढे आला. (वार्ताहर)