शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

दौंड येथे सर्वपक्षीय रास्ता रोको

By admin | Updated: August 28, 2015 04:31 IST

दौंड रेल्वे कुरकुंभ मोरीचे रखडलेले काम राजकारण न करता तातडीने सुरू करावे, तसेच मोरीतील सांडपाण्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात यावा, या मागणीसाठी दौंड येथे सर्वपक्षीय रास्तारोको

दौंड : दौंड रेल्वे कुरकुंभ मोरीचे रखडलेले काम राजकारण न करता तातडीने सुरू करावे, तसेच मोरीतील सांडपाण्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात यावा, या मागणीसाठी दौंड येथे सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. सुमारे अडीच तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे रेल्वे मोरी कुरकुंभ परिसरातील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.येथील शिवाजी चौकात सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्रित आले. गावातून हा मोर्चा रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ आला. या वेळी दौंड नगर परिषदेच्या कार्यपद्धतीविषयी आंदोलकांनी आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली. गेल्या दीड वर्षापूर्वी या कामाचे भूमीपूजन झाले असताना आजपर्यंत हे काम सुरू झाले असते तर तिसरी अद्ययावत कुरकुंभ मोरी पूर्ण होऊन शहरातील मोठी समस्या सुटली असती. मात्र, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि राजकीय डावपेचामुळे या मोरीचे काम जाणीवपूर्वक रखडवलेले आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. वीरधवल जगदाळे म्हणाले की, या कामाचे श्रेय राष्ट्रवादीला जाऊ नये, म्हणून नगर परिषदेने हेतूपुरस्पर हे काम रखडवलेले आहे. तेव्हा या कामाचे श्रेय नगर परिषदेने घ्यावे. मात्र जनतेच्या हितासाठी राजकारण करू नये. दौंड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अ‍ॅड. अजित बलदोटा म्हणाले की, जनतेच्या या विकास कामात अडथळा आणू नक, नाही तर जनता तुम्हाला येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.कुरकुंभ मोरीतून जाताना दुर्गंधी येते. नगर परिषदेचे पदाधिकारी देखील या मोरीतून जातात. त्यांना याचे भान नाही का, असा प्रश्न शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख राजेंद्र खटी यांनी उपस्थित केला़या वेळी नगरसेवक गुरुमुख नारंग, अनिल साळवे, नागसेन धेंडे, अनिल सोनवणे, आबा वाघमारे, सोहेल खान, हरेश ओझा, सागर पाटसकर, अशोक जगदाळे, सुनील शर्मा, संदीपान वाघमोडे, सचिन कुलथे, संतोष जगताप यांची भाषणे झाली. या वेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)