Pune | पुण्यात एक हजार भटक्या मांजरांची नसबंदी; ६९० पुणेकरांना चावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 06:41 PM2023-02-24T18:41:28+5:302023-02-24T18:43:36+5:30

पाच महिन्यांत एक हजार १९ भटक्या मांजरांची नसबंदी करून त्यांना रेबिजचे लसीकरण...

Sterilization of one thousand stray cats in Pune; 690 Pune residents were bitten | Pune | पुण्यात एक हजार भटक्या मांजरांची नसबंदी; ६९० पुणेकरांना चावा

Pune | पुण्यात एक हजार भटक्या मांजरांची नसबंदी; ६९० पुणेकरांना चावा

googlenewsNext

पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी शस्त्रक्रिया महापालिकेने गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू केली आहे. सप्टेंबर ते जानेवारीअखेर पाच महिन्यांत एक हजार १९ भटक्या मांजरांची नसबंदी करून त्यांना रेबिजचे लसीकरण केले. त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ जागी साेडण्यात आले आहे, तर याच कालावधीत ६९० पुणेकरांना या मांजरांनी चावा घेतला आहे.

सरकारच्या प्राणी कल्याण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना आता कुत्र्यांप्रमाणेच भटक्या मांजरींचीही नसबंदी शस्त्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. याची अंमलबजावणी करत पुणे महापालिकेने कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी सुरू केली आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी महापालिकेच्या आराेग्य विभागाकडून करण्यात येते. त्याच धर्तीवर मांजरांचेही माणसांना चावे वाढल्याने त्यांचीही संख्या नियंत्रणात राहावी, यासाठी पुणे महापालिकेने त्यांची नसबंदी करण्याचा निर्णय गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात घेतला हाेता.

या रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या मांजरांना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया, लसीकरण केले जाते. यानंतर त्यांना पुन्हा जेथून उचलले जाते तेथे सोडले जाते. नागरिकांनी आपल्या जवळच्या वॉर्ड ऑफिसमध्ये तक्रार करण्याची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली आहे. तक्रारीनंतर त्यांची नसबंदी आणि लसीकरण केले जाणार आहे.

मांजरांच्या नसबंदीत पुणे शहर अव्वल

मांजरांची नसबंदी करण्यामध्ये पुणे शहर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अव्वल ठरले आहे. पुण्यात १,०१९, पिंपरी चिंचवडमध्ये केवळ ३५ मांजरांची नसबंदी करण्यात आली आहे. तर याच पिंपरी चिंचवडमध्ये ३९२ मांजरांनी नागरिकांना चावा घेतला आहे. रायगड, ठाणे व अहमदनगर येथे एकाही मांजराची नसबंदी झालेली नाही. मात्र, चावेदेखील त्यांनी तेथे घेतले आहेत.

सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत १०१९ मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मांजर पाळायची असल्यास त्यासाठी त्यासाठी ५० रुपये वार्षिक फी आकारली जात आहे. त्याची नाेंदणी ऑनलाइन पद्धतीनेही करता येते. यामध्ये पहिल्यांदा नाेंदणी करताना दहा वर्षांचे नाेंदणी बंधनकारक असून, या दहा वर्षांची फी पाचशे रुपये आहे.

- सारिका फुंडे-भोसले, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महानगरपालिका

Web Title: Sterilization of one thousand stray cats in Pune; 690 Pune residents were bitten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.