सावत्र दिराने आंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 12:49 IST2022-01-16T12:49:04+5:302022-01-16T12:49:13+5:30
महिलेने लाजे पोटी व समाजात नाव बदनाम होईल या भीतीने तक्रार दिली नाही

सावत्र दिराने आंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन केला बलात्कार
पिंपरी : महिलेच्या अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मारहाण केली. तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. याप्रकरणी महिलेच्या सावत्र दिराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डिसेंबर २०२१ मध्ये ही घटना घडली.
याप्रकरणी पीडित २५ वर्षीय विवाहित महिलेने शनिवारी (दि. १५) फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या सावत्र दीर आहे. फिर्यादीचे व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी आरोपीने दिली. तसेच फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याशी जबरदस्ती करून शारीरिक संबंध केले. फिर्यादीचे अंघोळ करण्याचे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली.
ही घटना १६ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी तीनच्या सुमारास व चार ते पाच दिवसांनी घडली. फिर्यादीने लाजे पोटी व समाजात नाव बदनाम होईल या भीतीने तक्रार दिली नाही. त्यानंतर पतीसह पोलीस ठाणे गाठून त्यांनी याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.