Vande Bharat Express | कौतुकास्पद! ‘वंदे भारत’चे स्टेरिंग महिला लोको पायलटच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 12:20 IST2023-03-14T12:19:31+5:302023-03-14T12:20:02+5:30
मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्स्प्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले...

Vande Bharat Express | कौतुकास्पद! ‘वंदे भारत’चे स्टेरिंग महिला लोको पायलटच्या हाती
पुणे : भारतीय बनावटीच्या पहिल्या वेगवान वंदे भारत एक्स्प्रेसने आज खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केला. आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोमवारी सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे चालविली. मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्स्प्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले. रेल्वे मुंबईला पोहोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरेखा यादव यांचा सत्कार करण्यात आला.
सातारा येथील, सुरेखा यादव या १९८८ मध्ये भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
नवीन काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसची पायलट म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या ५ मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली.
- सुरेखा यादव, लोको पायलट