शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पुण्यातील ससून रुग्णालयामधील 'कोरोना वॉरियर्स' राहणार हॉटेल्समध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 06:00 IST

नायडू व ससून रुग्णालयासह शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देससूनच्या नवीन इमारतीमध्ये ५० बेडचा अतिदक्षता कक्ष व सुमारे १०० बेडचा विलगीकरण कक्ष तयार रुग्णालय प्रशासनाकडून सध्या डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या टीम तयार एका टीमध्ये सुमारे ५० जण असतील. ही टीम किमान सात दिवस काम करेलनवीन इमारतीमध्ये केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार

राजानंद मोरे- पुणे : ससून रुग्णालयाच्या बहुप्रतिक्षित नवीन इमारत ' कोविड रुग्णालय ' म्हणून सज्ज होत आहे. या इमारतीमध्ये रुग्णसेवा सुरू झाल्यानंतर तेथे सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी म्हणजे कोरोना वॉरियर्सचे विलगीकरण केले जाणार आहे. त्यांना घरी किंवा वसतिगृहात न पाठविता रुग्णालयाजवळील हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सध्या रुग्णालयात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची त्यांच्या गरजेनुसार व्यवस्था केली जात आहे.नायडू व ससून रुग्णालयासह शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नायडू रुग्णालयामध्ये ससून रुग्णालयातील काही निवासी डॉक्टर्स कार्यरत आहेत. तसेच महापालिकेच्या विविध रुग्णालयांतील डॉक्टर व परिचारिकाही तिथे सेवा देत आहेत. पण बहुतेक जण काम संपवून त्यांच्या घरी जातात. घरात जाण्यापूर्वी संपुर्ण दक्षता घेतली जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. सतत कोरोनाबाधितांच्या संपर्कात असल्याने त्यांना लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनाही हा धोका आहे. त्यामुळे घरात जाण्यापुर्वी दक्षता घेणे आवश्यक असते. यापार्श्वभूमीवर ससून रुग्णालयाने महत्वपुर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधितांच्या राहण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेलमध्ये केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार हॉटेलमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे समजते.ससूनच्या नवीन इमारतीमध्ये ५० बेडचा अतिदक्षता कक्ष व सुमारे १०० बेडचा विलगीकरण कक्ष तयार केला जात आहे. तो कक्ष दोन-तीन दिवसांत सुरू होणार आहे. तिथे काम करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून सध्या डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या टीम तयार केल्या आहेत. एका टीमध्ये सुमारे ५० जण असतील. ही टीम किमान सात दिवस काम करेल. त्यानंतर त्यांची जागा पुढची टीम घेईल. सध्या २५० जण सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यांना गरजेनुसार प्रशिक्षण व सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच हे काम सातत्याने सुरू आहे. नवीन इमारतीत काम सुरू झाल्यानंतर तेथील संपुर्ण ५० जणांच्या टीमची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली जाणार आहे. त्यांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था असेल. सात दिवसांनी त्यांची जागा दुसरी टीम घेईल. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनीही या माहितीला दुजोरा दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने ही व्यवस्था केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.-----------------नवीन इमारतीमध्ये केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. सद्यस्थितीवरून इथे येणारे अनेक रुग्ण अत्यवस्थ असू शकतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये विषाणुचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झालेला असू शकतो. वैद्यकीय कर्मचाºयांना त्यांच्यापासून लागण होण्याचा धोका अधिक आहे. तसेच हे कर्मचारी घरी गेल्यानंतर त्यांच्यापासून कुटूंबातील सदस्यांना लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षता म्हणून त्यांना हॉटेलमध्येच थांबवून ठेवले जाणार आहे. सध्याची आरोग्य विभागाकडील मनुष्यबळाची कमतरता पाहता ही दक्षता घेतली जाणार आहे. अधिकाधिक डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी उपलब्ध असावेत, यादृष्टीने हे पाऊल महत्वाचे आहे. दरम्यान, पुण्यामध्ये आतापर्यंत सुदैवाने कोरोना बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर किंवा परिचारिकेला कोरोनाची लागण झालेली नाही.--------------

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर