राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ११ मेपासून

By Admin | Updated: May 9, 2017 03:43 IST2017-05-09T03:43:57+5:302017-05-09T03:43:57+5:30

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने शतकोत्तर रौप्य वर्षानिमित्त हिंद केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर

State level Kabaddi competition from 11th May | राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ११ मेपासून

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ११ मेपासून

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने शतकोत्तर रौप्य वर्षानिमित्त हिंद केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर, राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन ११ ते १४ मे दरम्यान करण्यात येणार असून, या स्पर्धेत एकूण १० लाख २२ हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोडसे म्हणाले की, महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्याने बाबूराव सणस मैदानावर स्पर्धा होईल. विजेत्या पुरुष व महिला विजेत्या संघाला अनुक्रमे १ लाख ५१ रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे.
ट्रस्टचे सदस्य व नगरसेवक हेमंत रासणे म्हणाले की, या स्पर्धेसाठी सणस मैदानावर खास चार मातीची मैदाने तयार करण्यात आली आहेत. पुरुष आणि महिलांचे एकूण ३५ संघ सहभागी होणार आहेत. यात पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, ठाणे, सातारा येथील संघ सहभागी झाले आहेत.
पारितोषिके : पुरुष व महिला : प्रथम क्रमांक : अंतिम विजयी संघास रु. १,५१,०००/- आणि चषक, द्वितीय क्रमांक : अंतिम उपविजयी संघास रु. १,२५,०००/- आणि चषक, तृतीय क्रमांक : उपांत्य उपविजयी संघास रु. १,००,०००/- आणि चषक.

Web Title: State level Kabaddi competition from 11th May