शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

राज्य सरकारचा मद्य विक्रीचा निर्णय सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 11:00 PM

राज्यात लॉकडाऊनमध्ये राज्य शासनाने दारू विक्रीचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअनेक जणांनी कवितांच्या पंक्ती, विडंबनातून सोशल मीडियावर केली चर्चा सुरू

योगेश्वर माडगूळकर- पिंंपरी : दारुड्यांना दारुडे म्हणू नका, ते अर्थव्यवस्थेचे कणा आहेत. ‘जर दिसला कोठे लोळताना अर्थव्यवस्थेचा कणा, जबाबदारी ती तुमची त्याला सुखरूप घरी आणा!’ यासारख्या अनेक चारोळीने शासनाचा दारूविक्रीचा निर्णय सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. राज्यात लॉकडाऊनमध्ये राज्य शासनाने दारू विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यावर सोशल मीडियावर खुमासदार चर्चा सुरू आहे. अनेक जणांनी कवितांच्या पंक्ती, विडंबनातून सोशल मीडियावर चर्चा सुरू केली आहे. यापुढे दारू पित बसला असाल, त्या वेळी बायकोचा फोन आला, तर तिला सांगा आपण राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मीटिंगमध्ये आहोत, असा संदेशही फिरत आहे. दारूच्या मोठ्या बाटलीला खंबा का म्हणतात, हे मला आज कळाले.काही जणांनी हा निर्णयाचा मराठीतील न आणि ण मधील फरक पटवून देण्याचा प्रयत्न केल आहे. मराठी भाषेत न आणि ण अक्षराला किती महत्त्व आहे बघा.....निरोप मिळाला होता आपल्याला कोरोनाचा दारु''ण ''पराभव करायचा.... काही मंडळींनी त्याचा अर्थ दारू ''नं ''पराभव करायचा असा घेतला आहे...  असे खुमासदार जोकही सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.देशाच्या अर्थव्यवस्थेचे खांब म्हणून त्याला आपण खंबा म्हणतो, अशी टरही उडविली जात आहे. डोळे पुसून बस बये, डोळे पुसून बस, सरकाराकडून तेल आले, बिस्कूट आले, समधं समधं आलं, त्याबरोबर नवऱ्यासाठी दारू खुली करून रडणं पण दिल, अशी उपहासत्मक टीकाही केली जात आहे. 

सुरक्षित अंतर ठेवूनच रांग लावायची... पेग भरताना जशा आपण कट टू कट लाईन चेक करतो, ती आपली शिस्त इथेही दिसली पाहिजे. आणलेला माल नीट सॅनिटाईज करून मगच घरात घ्यावा. कित्येक दिवसांनी माल हातात आलाय म्हणून बाटली उलटवायची नाही. बेताने ग्लास भरावेत लॉगडाऊन किती वाढेल याचा नेम नाही.पहिल्यांदा शासनाचे जाहीर आभार मानावेत आणि मगच मुख्य कार्यक्रमाला सुरवात करावी, अशी खुमासदार टिप्पणी सोशल मीडियावर सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाliquor banदारूबंदीState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस