शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 5:49 PM

शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू

ठळक मुद्देप्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शनिवार वाड्यावर ध्वजारोहण्

पुणे : शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.    प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आज शिवाजीनगर पोलीस परेड ग्राउंड येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम,  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पवार यांनी विविध पथकांची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. यावेळी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त व विशेष सुरक्षा पदक प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.    यावेळी राज्य राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, पुणे पोलीस आयुक्त कार्यालय पथक, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, महिला पोलीस दल, रेल्वे पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या पथकांनी संचलन केले. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, वन विभाग, सामाजिक वनीकरण, आरोग्य विभाग यांनी माहितीपर चित्ररथ सादर केले. यावेळी पोलीस वाद्यवृंद, वाहतूक पोलीस मोटर सायकल रायडर पथक, श्वान जॅक गुन्हे शोधक यांनी सलामी दिली.------------------------डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी भारताचे संविधान उद्देशिकाचे वाचनही करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.----------------जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शनिवार वाड्यावर ध्वजारोहण् परंपरेनुसार शनिवार वाडयावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, श्रीमंत पाटोळे, अमृत नाटेकर, भारत वाघमारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, उप विभागीय अधिकारी संतोष देशमुख आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.--------------सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहणनवीन मध्यवर्ती इमारत परिसरात सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार