शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडून दहा तीर्थक्षेत्रांना ‘ब ’दर्जा जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 17:53 IST

या संदर्भातील प्रस्तावाची फाईल तीन महिन्यांपूर्वी मुंबईतील बांधकाम भवन येथे दाखल करण्यात आली होती. यापूर्वी चिंतामणी गणपती देवस्थानास तीर्थक्षेत्राचा 'क' वर्ग दर्जा प्राप्त होता.

ठळक मुद्देलेण्याद्री व ओझरच्या गणपतींचा समावेश मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये सदर प्रस्तावास मान्यता

लोणी काळभोर : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील दहा देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा 'ब' वर्ग दर्जा जाहीर झाला आहे. त्यात अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील श्रीक्षेत्र चिंतामणी देवस्थान व लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट आदी देवस्थानांचा समावेश करण्यात आला आहे.     या संदर्भातील प्रस्तावाची फाईल तीन महिन्यांपूर्वी मुंबईतील बांधकाम भवन येथे दाखल करण्यात आली होती. यापूर्वी चिंतामणी गणपती देवस्थानास तीर्थक्षेत्राचा 'क' वर्ग दर्जा प्राप्त होता. आता तो रद्द करून तीर्थक्षेत्राचा 'ब' वर्ग दर्जा देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मा.असिम गुप्ता व उपसचिव मा.मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये सदर प्रस्तावास मान्यता देण्यात आली. तीर्थक्षेत्राचा वरिष्ठ 'ब' वर्ग दर्जा प्राप्त असणाऱ्या  देवस्थानांना विकासकामे करण्यासाठी राज्यसरकारकडून मोठ्या प्रमाणात भरीव निधी दिला जातो. 'ब' वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे श्रीक्षेत्र थेऊर गावचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे यांनी व्यक्त केले.  याकामी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे, विधान भवनाचे उपसचिव राजेश तारवी, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासरावजी देवकाते यांचे विशेष सहकार्य लाभले. महाराष्ट्रातील  'ब' वर्ग दर्जा प्राप्त झालेली तीर्थक्षेत्र पुढीलप्रमाणे : श्रीक्षेत्र चिंतामणी देवस्थान, ता. हवेली, जि. पुणे. श्री. लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट, गोळेगांव, ता. जुन्नर, जि. पुणे. श्री. कुलस्वामी खंडेराय देवस्थान, श्रीतीर्थक्षेत्र वडज, ता. जुन्नर, जि. पुणे.श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर, ठेंगोडा, ता. बागलान, जि. नाशिक. श्री. सिद्धेश्वर महादेव मंदीर, करंजगाव, ता. निफाड, जि. नाशिक.श्री. जटाशंकर देवस्थान, मुळज, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद. श्रीक्षेत्र जकराया मंदिर, चेबकी, ता. मोहोळ, जि. सोलापूर.प.पू. सदगुरू चंपामाई महाराज साधक आश्रम, चाटा, ता. जि. लातूर.श्री. राधाकृष्ण मंदिर, गातेगांव, ता. जि. लातूर.श्री. महादेव मंदिर, निढोरी, ता. कागल, जि. कोल्हापुर.

     

टॅग्स :PuneपुणेAshtavinayakअष्टविनायक गणपतीTempleमंदिरMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार