शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

घर भाडे करारासाठी मुद्रांक नोंदणीच कायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 12:57 PM

सदनिका मालक व भाडेकरी काही अटी व शर्थी शंभर किंवा पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून करार करतात. परंतु,त्याला कायदेशीर आधार नाही.

ठळक मुद्देनागरिकांनी मुद्रांक शुल्क विभागाकडे अत्यल्प शुल्क भरून करार करणे अपेक्षित मुद्रांक शुल्क विभागाने आॅनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध मुद्रांक शुल्क भरून करार केल्यास भाडेकरू सदनिकेवर दावा दाखवू शकतो, सदनिका मालकांचा समज

पुणे : सदनिका मालक व भाडेकरी यांच्यात केला जाणारा भाडे करार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे मुद्रांक शुल्क भरून करणे कायदेशीर असून त्यासाठी विभागाने आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अत्यंत कमी शुल्क भरून नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येतो. त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणा-या सुविधेचा लाभ घेवून भाडे करार करावे,असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी केले.राज्यातील लहान मोठ्या शहरामध्ये नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने आलेले नागरिक व विद्यार्थी भाडे तत्त्वावर सदनिका घेतात. त्यासाठी सदनिका मालक व भाडेकरी काही अटी व शर्थी शंभर किंवा पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून करार करतात. परंतु,त्याला कायदेशीर आधार नाही. त्यामुळे नागरिकांनी मुद्रांक शुल्क विभागाकडे अत्यल्प शुल्क भरून करार करणे अपेक्षित आहे. त्यासाठीच मुद्रांक शुल्क विभागाने आॅनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिला आहे. ही सुविधा आॅनलाईन असल्याने नागरिकांना मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही,असेही कवडे यांनी सांगितले.मुद्रांक शुल्क भरून करार केल्यास भाडेकरू एखाद्या सदनिकेवर दावा दाखवू शकतो, असा चुकीचा समज सदनिका मालकांनी करून घेतला आहे. भाडेकरूने ११ किंवा १२ महिने आणि ३ वर्ष अशा कितीही कालावधीसाठी भाडे करार केला तरी त्याला संबंधित सदनिकेवर दावा सांगता येत नाही,असे नमूद करून कवडे म्हणाले,मुद्रांक शुल्क विभागातर्फे भाडे करारासाठी घर भाड्याच्या आणि अमानत रक्कमेच्या केवळ ०.२५ टक्के रक्कम रक्कम आकारली जाते. तसेच मुद्रांक विभागाकडून केलेल्या कराराला कायदेशीर मुल्य आहे.

टॅग्स :PuneपुणेHomeघर