शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Murlidhar Mohol: पुणे मेट्रोच्या थांबलेल्या कामाचा निर्णय येत्या ८ दिवसांत होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 3:08 PM

गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप मंडळांनी घेतला होता

ठळक मुद्देमध्यम मार्ग काढण्याच्या निर्णयाला गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा

पुणे : पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींची मिरवणूक छत्रपती संभाजी महाराज पुलावरून जाते. पुलावरून जाणाऱ्या मेट्रोच्या गर्डरमुळे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप मंडळांनी घेतला होता. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रोचे काम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मेट्रो, गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक घेतली जाईल असे सांगितले होते. गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डरच्या उंचीबाबतच्या विषयात येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असून या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाले आहे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. 

त्यानुसार महापौर निवास येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर सुनीताताई वाडेकर, महामेट्रोचे महाव्यवस्थापक श्री. ब्रिजेश दीक्षित, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेस गटनेते श्री. आबा बागुल, गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

''मेट्रोच्या कामाबाबत निर्माण झालेल्या मुद्द्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असून गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या सूचना, कल्पना आणि पर्याय याची सविस्तर माहिती घेतली आहे. बैठकीस मेट्रोच्या तांत्रिक विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याने यावर लवकरच तोडगा काढण्यात यश येणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.''

मध्यम मार्ग काढण्याच्या निर्णयाला गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा

पुण्यातील गणेशोत्सव हा समाजभान जपणारा उत्सव म्हणून जगभर ओळखला जातो. या विषयातही समाजभान जपत याबाबत मध्यम मार्ग काढण्याच्या निर्णयाला गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याबाबत विलंब न करता येत्या आठ दिवसातच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरBJPभाजपाGanpati Festivalगणेशोत्सवMetroमेट्रो