Pune Crime: शरीरसुखास नकार दिल्याने विवाहितेवर चाकूने वार, आरोपीला सहा वर्षांची सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 10:25 IST2023-08-02T10:24:21+5:302023-08-02T10:25:06+5:30
आरोपीला न्यायालयाने सहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली...

Pune Crime: शरीरसुखास नकार दिल्याने विवाहितेवर चाकूने वार, आरोपीला सहा वर्षांची सक्तमजुरी
पुणे : शरीरसुखास नकार दिल्याच्या कारणावरून विवाहितेवर चाकूने वार करीत खुनाचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने सहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक यांनी हा निकाल दिला. अलिम यासिन शेख (वय ३४,रा. दत्तवाडी निमोणे, शिरूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद केले आहे.
११ मार्च २०१७ रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली हाेती. याबाबत सासूने शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी काम पाहिले.