केवळ २५ रुपयांच्या ५ डिस्पोझिबल प्लेटचे पैसे मागितल्याने कोयत्याने वार; विक्रेता गंभीर जखमी

By विवेक भुसे | Published: April 30, 2023 04:17 PM2023-04-30T16:17:45+5:302023-04-30T16:18:07+5:30

डिस्पोझिबल प्लेटचे पैसे मागितल्याने गुंडाच्या टोळक्याने दुकानातील दोघांवर जीवघेणा हल्ला केला

Stabbed for demanding money for 5 disposable plates worth Rs 25 only; Seller seriously injured | केवळ २५ रुपयांच्या ५ डिस्पोझिबल प्लेटचे पैसे मागितल्याने कोयत्याने वार; विक्रेता गंभीर जखमी

केवळ २५ रुपयांच्या ५ डिस्पोझिबल प्लेटचे पैसे मागितल्याने कोयत्याने वार; विक्रेता गंभीर जखमी

googlenewsNext

पुणे : घरगुती अथवा सार्वजनिक कार्यक्रमात वापरण्यास सोयीचे आणि अत्यंत स्वस्त म्हणून डिस्पोझिबल प्लेट व इतर साहित्यांचा वापर वाढला आहे . केवळ पंचवीस रुपयांच्या या ५ डिस्पोझिबल प्लेटचे पैसे मागितल्याने गुंडाच्या टोळक्याने दुकानातील दोघांवर जीवघेणा हल्ला केला.

धर्माराम गोकुळराम बंजारा (वय २२, रा. चिंतामणी रेसिडेन्सी, सुखसागरनगर, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी निखील नितीन गावडे (वय २२, रा. राजीव गांधीनगर, अप्पर बिबवेवाडी) याला अटक केली असून त्याच्या इतर तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अप्पर बिबवेवाडी येथील अंबिका डिस्पोझबल अँड बर्थ डे हाऊसमध्ये २८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धर्माराम बंजारा व त्यांचा साथीदार मंलगराम बंजारा हे दोघे अंबिका डिस्पोझिबल या दुकानात काम करीत होते. त्यावेळी निखील गावडे व त्याचे साथीदार आले. त्याने त्यांच्याकडे सुट्या ५ डिस्पोझिबल प्लेट मागितल्या. फिर्यादीने त्यांना ५ प्लेट देऊन त्याचे पैसे मागितले. या कारणावरुन त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन त्यांच्यातील एकाने हातातील कोयत्याने फिर्यादीचे हातावर, कपाळावर मारुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचा सहकारी मंलगराम याच्या हाताचे बोटावर वार करुन त्याला जखमी केले. लाठ्या काठ्याने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक एस एम आदलिंग तपास करीत आहेत.

Web Title: Stabbed for demanding money for 5 disposable plates worth Rs 25 only; Seller seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.