शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता उखडल्याने एसटी होणार बंद

By admin | Updated: June 27, 2017 07:43 IST

कडूस-राजगुरुनगर रस्त्यालगतच्या आगरमाथा- रानमळा या चौदा वर्षांपूर्वीच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याचे मजबुतीकरण

लोकमत न्यूज नेटवर्ककडूस : कडूस-राजगुरुनगर रस्त्यालगतच्या आगरमाथा- रानमळा या चौदा वर्षांपूर्वीच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी रानमळा ग्रामस्थांनी विद्यमान आमदार सुरेश गोरे यांच्याकडे मागणी केलेली आहे. रानमळा-आगरमाथा दोन किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीअभावी लहान-मोठ्या खड्ड्याच्या चाळणीने पूर्णपणे उखडला आहे. या लहान गावात दवाखाना, हायस्कूल, कॉलेज नसल्याने संबंधितांना लगतच्या दोंदे, राजगुरुनगर या गावी जावे लागते. या गावाला दिवसातून तीन वेळा एसटीच्या फेऱ्या होतात. रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने तसेच अरुंद असल्याने राजगुरुनगर आगर स्थानकाने एसटी सेवा बंद करण्याची ग्रामपंचायतीला सूचना दिली आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, आजारी लोक व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मान्यवरांनी उद्घाटन केलेले आहे. पण या कामाचे पुढे काय झाले, याबाबत ग्रामस्थ संभ्रमात आहेत. पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आमदार सुरेश गोरे यांनी एक किलोमीटर रस्त्यासाठी २0 लाखांची तरतूद केल्याचे तसेच उर्वरित दुसऱ्या किलोमीटरसाठी आगामी बजेटमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिलेले आहे. उद्घाटने व आश्वासनांच्या पूर्ततेकडे रानमळा ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.