ST Strike | एसटी कर्मचाऱ्यांनी शेवटचे अल्टिमेटम धुडकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 10:33 AM2022-04-01T10:33:18+5:302022-04-01T10:38:00+5:30

मार्च महिन्यांत परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना तीन वेळा अल्टिमेटम दिला...

st employees rejected the last ultimatum st strike in maharashtra | ST Strike | एसटी कर्मचाऱ्यांनी शेवटचे अल्टिमेटम धुडकावले

ST Strike | एसटी कर्मचाऱ्यांनी शेवटचे अल्टिमेटम धुडकावले

Next

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांनी ३१ मार्चचे शेवटचे अल्टिमेटम धुडकावले आहे. शेवटच्या दिवशी केवळ २३ कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा रस्ता सोडून एसटीची वाट धरली आहे. मार्च महिन्यात पुणे विभागात जवळपास २३४ कर्मचारी कामावर परतले आहे, तर आजतागायत पुणे विभागाच्या ४५१ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली आहे. चार हजार २०० पैकी १३०० कर्मचारी कामावर परतले आहे. उर्वरित कर्मचारी अजूनही आंदोलनातच सहभागी आहेत.

मार्च महिन्यांत परिवहनमंत्री अनिल परब (anil parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना तीन वेळा अल्टिमेटम दिला. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. २३४ कर्मचारी कामावर परतले आहेत. मात्र अजूनही जवळपास तीन हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून (दि. १) पुन्हा बडतर्फीची कारवाई सुरू केली जाणार आहे. दरम्यानच्या काळात बडतर्फीची कारवाई थांबविण्यात आली होती.

मागील दोन महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे राज्यातील परिवहन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. काही कर्मचारी कामावर येत असल्याने काही ठिकाणी बसेस सुरू झाल्या आहेत. पण अजूनही मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावरच आहेत.

Web Title: st employees rejected the last ultimatum st strike in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.