शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

पुण्यातील कात्रीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आली ‘शिवशाही’ बस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 10:00 PM

कोरोनाच्या प्रभावामुळे पुणे व मुंबईतील शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, तसेच खानावळी व उपहारगृहे बंद करण्यात आलेली आहेत.

ठळक मुद्देविदर्भ, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना होणार फायदापुण्यात व मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या गावी परत जाण्याशिवाय नाही पर्यायअडचणींचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक खासगी कंपन्या सरसावल्याचे चित्र

पुणे : राज्य परिवहन महामंडळातर्फे नागपूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड या शहरांपर्यंत पुण्यातून अतिरिक्त ‘शिवशाही’ बस सोडण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील लाखो विद्यार्थ्यांना या अतिरिक्त बसचा फायदा होऊ शकेल. खासगी बसमार्फत होणाऱ्या आर्थिक शोषणाबाबत सहयोग ट्रस्टच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.     कोरोनाच्या प्रभावामुळे पुणेमुंबईतील शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, तसेच खानावळी व उपहारगृहे बंद करण्यात आलेली आहेत. स्पर्धा परीक्षा देणारी मुले विविध अभ्यासिकांमध्ये अभ्यास करतात. त्या अभ्यासिका बंद करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणासाठी पुण्यात व मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या गावी परत जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. या अडचणींचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक खासगी कंपन्या सरसावल्याचे चित्र दिसून आले. त्यात खासगी बसचालक यांचा मनमानीपणा सुरू होता. वाटेल ते प्रवासदर आकारले जात होते.   अ‍ॅड. असीम सरोदे यांनी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनाही खासगी बस कंपन्यांकडून होणाºया आर्थिक शोषणाबाबतची माहिती दिली. त्यांनी त्वरित परिवहनमंत्री यांच्याशी संपर्क करून विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परतण्यासाठी जादा बसची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळाने करावी, अशी विनंती केली. कोरोना आजाराशी एकीकडे लढा सुरू असताना या परिस्थितीचा गैरफायदा घेणाºया खासगी बस कंपन्यांबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मागणीला परिवहनमंत्र्यांनी त्वरित प्रतिसाद दिला.  

* पुणे ते नागपूर प्रवासासाठी ४००० ते ४५०० रुपये घेण्यात येत आहेत. पुण्यातून मराठवाडा व विदर्भात जाण्यासाठी प्रचंड आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे प्रवासी म्हणून होणारे हे आर्थिक शोषण रोखण्यासाठी अ‍ॅड. असीम सरोदे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री, तसेच विधानसभेच्या उपसभापती नीलम गोºहे यांना माहिती दिली. याचिकेसंदर्भात उच्च न्यायालयाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देऊनही प्रवाशांचे आर्थिक शोषण सुरू असल्याची खंत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केली.०००

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीShivshahiशिवशाहीMumbaiमुंबई