फ्रॅक्चर हात गळ्यात बांधून क्रीडामंत्री भरणेंनी धरला लग्नात अंतरपाट..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 20:03 IST2025-02-19T20:02:53+5:302025-02-19T20:03:28+5:30
पुण्यामधील एका व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भरणे हे खेळताना पडले यामध्ये त्यांचा उजवा हात फॅक्चर झाला

फ्रॅक्चर हात गळ्यात बांधून क्रीडामंत्री भरणेंनी धरला लग्नात अंतरपाट..
कळस - राज्याचे क्रीडा व युवक मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उजव्या हाताला फॅक्चर झालंय. फॅक्चर झालेला हात गळ्यात बांधून भरणे एका विवाह सोहळ्यात सहभागी झाले आणि केवळ सहभागी न होता नवरदेव नवरीसाठी असणारा अंतरपाट स्वतः धरत या नववधू वरांना शुभाशीर्वाद देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
पुण्यामधील एका व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भरणे हे खेळताना पडले यामध्ये त्यांचा उजवा हात फॅक्चर झाला. त्यांच्या हातावरती उपचार सुरू आहेत. सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हात गळ्यात बांधण्यात आलेला आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी भरणे यांनी लग्न समारंभ गाठण्याचे ठरवले.
भिगवण ता इंदापूर येथे अकोले येथील शिक्षक सचिन गायकवाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा होता. या सोहळ्याला भरणे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. कार्यकर्त्याला प्राधान्य देत मंत्री भरणे या सोहळ्यात सहभागी झाले.केवळ सहभागी झाले नाहीत तर थेट नव वधूवरांचा अंतरपाट धरला.शुभाशीर्वाद दिले. हा अनोखा प्रसंग उपस्थित पाहुणे व मान्यवरांना भावला त्यामुळे भरणे यांचा साधेपणा पुन्हा अधोरेखित झाला.