भरधाव चारचाकीची सात-आठ वाहनांना धडक, तीन जखमी; कात्रज परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 15:39 IST2023-11-17T15:38:13+5:302023-11-17T15:39:55+5:30
भरधाव चारचाकी वाहनाने सहा ते सात वाहनांना धडक दिल्याची घटना...

भरधाव चारचाकीची सात-आठ वाहनांना धडक, तीन जखमी; कात्रज परिसरातील घटना
धनकवडी (पुणे) :धनकवडी परिसरात भरधाव चारचाकी वाहनाने सहा ते सात वाहनांना धडक दिल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) दुपारी दोनच्या दरम्यान घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव पठार परिसरातील एक अल्पवयीन मुलगा आपल्या मित्राबरोबर आय ट्वेंटी चारचाकीमधून राऊंड मारत असताना धनकवडी येथील सावरकर चौकात एका रिक्षाला धडक दिली. अपघात झाल्यामुळे तसेच चौकातील नागरिक मागे लागल्यामुळे घाबरुन त्यांनी गाडी भरधाव पळवली. त्यात रस्तात सात आठ वाहनांना धडक देत सातारा रस्ता, बालाजीनगर परिसरात नागरिकांना त्यांना पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.