शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

एमएसआरडीसीच्या रिंगरोडसाठी खास तरतूद; तब्बल १५  हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 1:58 PM

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बाहेरून येणारी वाहतूक शहराबाहेर वळविण्यासाठी १७० किलोमीटर लांबीचा रिंगरोड बांधणार आहे.

ठळक मुद्देतेरा वर्षांपासून होती चर्चा : प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या रिंगरोड प्रकल्पासाठी शासनाने प्रथमच अर्थसंकल्पामध्ये खास तरतूद केली आहे. यामुळे गेल्या १३ वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोड प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बाहेरून येणारी वाहतूक शहराबाहेर वळविण्यासाठी १७० किलोमीटर लांबीचा रिंगरोड बांधणार आहे. यासाठी तब्बल १५  हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे. शासनाने सन २००७मध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यात रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला. त्यानंतर सन २०११मध्ये शासनाने एमएसआरडीसीच्या रिंगरोडला मान्यता दिली; परंतु दरम्यानच्या कालावधीत पीएमआरडीएकडूनदेखील एक रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला. यामध्ये एमएसआरडीसी आणि पीएमआरडीए हे दोन्ही रिंगरोड काही ठिकाणी एकत्र येत असल्याने नक्की कोणता रिंगरोड  होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यामध्ये पीएमआरडीए आणि एमएसआरडीसी दोघेही आपल्या रिंगरोडसाठी अग्रही होती. अखेर शासनाने एमएसआरडीसीच्या रिंगरोडला हिरवा कंदील दाखविला असल्याची माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता ए. नागरगोजे यांनी दिली. राज्य शासनाने एमएसआरडीसीच्या पश्चिम भागातील रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्ग १’ असा दर्जा दिला आहे. याबाबतची अधिसूचनादेखील शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामुळे राज्यात समृद्धी महामार्गानंतर ‘विशेष महामार्गा’चा दर्जा मिळणारा एमएसआरडीसीचा रिंगरोड हा दुसरा महामार्ग ठरला आहे. एमएसआरडीसीकडून दोन टप्प्यांत रिंगरोडचे काम करण्यात येईल. पहिला टप्पा पूर्व भागातील रिंगरोड व दुसरा टप्पा पश्चिम भागातील रिंगरोड करण्यात आला असल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपविभागीय अभियंता संदीप पाटील यांनी दिली. ........असा असेल पूर्व भागातील रिंगरोड पूर्व भागातील रिंगरोडच्या मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये हवेली तालुक्यातील भावडी, लोणीकंद, डोंगरगाव, बकोरी, वाडे बोल्हाई, शिरसवाडी, मुरकुटेनगर, गावडेवाडी बिवरी, कोरेगाव मूळ, नायगाव, सोरतापवाडी, तरडे व आळंदी म्हातोबाची अशा १४ गावांतून रिंगरोड जाईल. पुरंदर तालुक्यातील सोनोरी, दिवे, पवारवाडी, हिवरे, चांभळी, गराडे व सोमुर्डी ही ७ गावे, भोर तालुक्यातील कांबरे, नायगाव, केळवडे, साळवडे, वरवे बुद्रुक या ५ गावांचा समावेश आहे. अशा प्रकारे ४ तालुक्यांतील ३० गावांमधून हा पूर्व भागातील रिंगरोड जाणार आहे. ..............असा असेल पश्चिम भागातील रिंगरोड भोर तालुक्यातील केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव, रांजे या ५ गावांतून, हवेली तालुक्यातील रहाटावडे, कल्याण, घेरासिंहगड, खामगाव मावळ, मालखेड, वरदाडे, मांडवी बुद्रुक, सांगरूण, बहुली या ९ गावांतून, मुळशी तालुक्यातील कातवडी, मुठा, मारणेवाडी, आंबेगाव, उरवडे, कासार आंबोली, भरे, आंबडवेट, घोटावडे, रिहे, पडळघरवाडी, जवळ, केमसेवाडी आणि पिंपळोली अशी १४ गावे आणि मावळ तालुक्यातील पाचाणे, चांदखेड, बेबडओहोळ, धामणे, परंदवाडी, जवळ आणि उर्से अशा ६ गावांचा समावेश आहे. अशा प्रकारे ४ तालुक्यांतील ३४ गावांमधून पश्चिम रिंगरोड जाणार आहे. 

......... 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMRDAपीएमआरडीएState Governmentराज्य सरकारbudget 2020बजेट