शिवनेरीवर विशेष टपाल पाकिट

By Admin | Updated: February 18, 2017 02:49 IST2017-02-18T02:49:23+5:302017-02-18T02:49:23+5:30

शिवजयंती निमित्त पोस्ट मास्तर जनरल कार्यालयाच्या वतीने शिवनेरी किल्ल्यावर विशेष टपाल पाकिट काढण्यात आले असून, त्याचे

Special postal ward at Shivneri | शिवनेरीवर विशेष टपाल पाकिट

शिवनेरीवर विशेष टपाल पाकिट

पुणे : शिवजयंती निमित्त पोस्ट मास्तर जनरल कार्यालयाच्या वतीने शिवनेरी किल्ल्यावर विशेष टपाल पाकिट काढण्यात आले असून, त्याचे अनावरण खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
हा कार्यक्रम पुणे रेल्वेस्थानक येथील पोस्टमास्तर जनरल कार्यालयात १९ फेब्रुवारीरोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
सर्व शिवप्रेमी, फिलाटेलीस्ट तसेच तिकीट संग्राहक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष टपाल पाकिट पुणे स्थानक येथील मुख्य टपाल कार्यालय व विभागातील निवडक टपाल कार्यालयात मिळतील, असे टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Special postal ward at Shivneri