गोविंदबागेत बर्थ डे सेलिब्रेशन, सुप्रियाताईंनी केक आणला अन् शरद पवारांनी भरवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 21:38 IST2020-07-16T21:03:57+5:302020-07-16T21:38:47+5:30

कोरोनामुक्त झाल्यावर मंत्री मुंडे होम क्वारंटाईनमध्ये होते. तो कालावधी पूर्ण झाल्यावर मुंडे यांनी ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेतली.

Special celebration of Dhananjay Munde's birthday by pawar family in baramati | गोविंदबागेत बर्थ डे सेलिब्रेशन, सुप्रियाताईंनी केक आणला अन् शरद पवारांनी भरवला

गोविंदबागेत बर्थ डे सेलिब्रेशन, सुप्रियाताईंनी केक आणला अन् शरद पवारांनी भरवला

ठळक मुद्देमाळेगाव येथील गोविंदबाग निवासस्थानी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली भेट

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या माळेगाव येथील गोविंदबाग निवासस्थानी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली.मुंडे यांचा १५ जुलैला वाढदिवस होता. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी मुंडे यांना केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोनामुक्त झाल्यावर मंत्री मुंडे होम क्वारंटाईनमध्ये होते. तो कालावधी पूर्ण झाल्यावर मुंडे यांनी गुरुवारी (दि. १६) ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेतली. मुंडे यांचा १५ जुलैला वाढदिवस होता.याची आठवण ठेवत खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत केक आणुन त्यांचा वाढदिवस साजरा केला.सोशल मीडियावर खासदार सुळे यांनी छायाचित्र पोस्ट करीत शुभेच्छा दिल्या.  तसेच  पवार यांनी स्वत : मुंडे यांना केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्येष्ठ नेते पवार,खासदार सुळे यांच्यासह प्रतिभा पवार ,सदानंद सुळे,यांच्या उपस्थितीत मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याबाबतचे छायाचित्र मंत्री मुंडे यांनी देखील सोशल मीडियावर शेअर करीत माहिती दिली. कोरोनामुक्त झाल्यावर साहेंबांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कुटुंब आहे.या कुटुंबाचा आधारवड कुटंबासाठी भक्कम उभा असतो,अशा शब्दात मुंडे ज्येष्ठ नेते पवार,खासदार सुळे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.


———————————
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या माळेगांव येथील गोविंदबाग निवासस्थानी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली.यावेळी खासदार सुप्रिया सुळे,प्रतिभा पवार,सदानंद सुळे उपस्थित होते.

Web Title: Special celebration of Dhananjay Munde's birthday by pawar family in baramati