शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची गाडी दिसताच तो शिरला थेट आत

By admin | Updated: July 2, 2015 23:58 IST

अपहरणकर्त्यांनी त्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढली़... कॉईन बॉक्स दिसल्यावर तेथून ‘घरी फोन करून २० लाख रुपये द्यायला सांग,’ अशी त्याला धमकी दिली़ तो गाडीतून खाली

लोणी काळभोर : अपहरणकर्त्यांनी त्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढली़... कॉईन बॉक्स दिसल्यावर तेथून ‘घरी फोन करून २० लाख रुपये द्यायला सांग,’ अशी त्याला धमकी दिली़ तो गाडीतून खाली उतरला़ कॉईन बॉक्सकडे जात असतानाच पोलिसांची गाडी दिसली अन तो पळत जाऊन गाडीत बसला़... अपहरणकर्त्यांनी पोलिसांना पाहताच धूम ठोकली़ २० लाखांच्या खंडणीसाठी उदगीरहून अपहरण करून आणलेल्या तरुणाने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे सुटका होऊ शकली़बाळू शंकरराव पाटोदे (वय २५, रा. कृष्णाई गार्डनशेजारी, उदगीर, जि. लातूर) असे या तरुणाचे नाव आहे़याबाबतची हकीकत अशी : पहाटे पावणेचारच्या सुमारास दरवाजा ठोठाविल्याच्या आवाज आल्याने बाळू उघडण्यासाठी जात असतानाच दरवाजा तोडून चार जण घरात शिरले़ त्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकली व पकडून नेऊन स्कार्पिओ गाडीत (एमएच १४-डीएक्स ९९११) बसविले़ गाडी पुण्याच्या दिशेने निघाल्यानंतर त्याचे डोळे बांधण्यात आले. त्यातील एकाने ‘तू २० लाख रुपये आजच्या आज दे, नाही तर तुझा खून करू,’ अशी धमकी दिली. त्या वेळी त्यांच्याकडे पिस्तुल, तलवारी व चाकू होते. गाडी उदगीरच्या पुढे आल्यावर त्यांनी त्याच्या हातातील प्रत्येकी अर्धा तोळा वजनाच्या तीन अंगठ्या, दोन तोळ्यांचे ब्रेसलेट व दोन साखळ्या, असा एकूण ८ तोळ्यांचा सोन्याचा ऐवज हिसकावून काढून घेतला.स्कार्पिओ सोलापूर-पुणे महामार्गावरील यवत टोलनाक्यावर आल्यानंतर बाळूच्या डोळ्यांवरील पट्टी सोडण्यात आली. ते थेऊर येथे एका दुकानातील कॉईन बॉक्स दाखवून ‘तू घरी फोन करून घरच्यांना सायंकाळपर्यंत २० लाख रुपये आणण्यास सांग, तसेच पैसे न आणता पोलिसांना कळविण्याचा प्रयत्न केला, तर तुझा मर्डर झाला समज’ अशी धमकी देऊन त्याला खाली उतरववले... आणि तो थेट पोलिसांच्या गाडीत जावून बसला.हवालदार दत्तात्रय गिरमकर व बाळासाहेब चोरामले हे पेट्रोलिंग करीत होते. बाळूने त्यांना आपले आपहरण झाल्याचे सांगताच त्यांनी कोलवडीपर्यंत गाडीचा पाठलाग केला; परंतु अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलीस निरीक्षक कोंडूभैरी यांनी सांगितले, आम्ही सर्व बाबी पडताळून पाहत आहोत. अपहरणकर्त्यांच्या मागावर पोलीस पथक पाठविण्यात आले असून, त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्याने लवकरात लवकर त्यांना जेरबंद करण्यात येईल. बाळूचे नातेवाईक उदगीरहून पुण्याकडे येण्यास निघाले आहेत़सुटका करता आली, हे समाधानहवालदार दत्तात्रय गिरमकर यांनी सांगितले, की आम्ही पेट्रोलिंग करीत थेऊरला आलो असताना अचानक एक तरुण धावत आमच्या गाडीपाशी आला़ आपले तोंड गाडीत घालून ‘ते मला मारतात-मारतात’ असे म्हणून लागला़ मी त्याला तसाच गाडीत घेतला़ त्या वेळी काही मुले गाडीजवळ आली़ ‘हे मारतात का?’ असे विचारल्यावर ‘हे नाही, ते’ असे सांगून त्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या काही जणांकडे हात दाखविला़ त्याबरोबर ते सर्व जण पळत गाडीत जाऊन बसले़ मी मुलांना ओरडून सांगितले, ‘अरे पकडा त्यांना.’ तेव्हा तेथील मुलेही त्यांच्यामागे धावली़; पण तोपर्यंत त्यांनी गाडी सुरू करून पळायला सुरुवात केली़ आम्ही गाडीतून व काही मुलांनी मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली़ केसनंदपर्यंत पाठलाग केला़ वाटेत एक ट्रेलर आडवा आल्याने ते पळून गेले़मात्र बाळूची सुटका करता आली याचे समाधान आहे.