खर्चायला पैसे देत नाही म्हणून वडिलांवर मुलाने केले कटरने वार; इंदापूर तालुक्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 20:11 IST2021-07-07T20:10:14+5:302021-07-07T20:11:10+5:30

आरोपीने खर्चायला ५०० रूपये मागत त्यांना शिवीगाळ केली.

The son attack on father for not gave money; Incidents in Indapur taluka | खर्चायला पैसे देत नाही म्हणून वडिलांवर मुलाने केले कटरने वार; इंदापूर तालुक्यातील घटना 

खर्चायला पैसे देत नाही म्हणून वडिलांवर मुलाने केले कटरने वार; इंदापूर तालुक्यातील घटना 

बाभुळगाव : वडापुरी (ता.इंदापूर) येथे मुलाने ५०० रूपयांसाठी वडिलांना लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांच्या पाठीवर रेडियम कापायच्या कटरने वार करत जन्मदात्यालाच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याबाबत जखमी बाळासाहेब पंढरीनाथ माने (वय ६०, रा. वडापुरी, ता.इंदापूर,जि.पुणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे. संतोष बाळासाहेब माने (रा.वडापुरी,ता.इंदापूर,जि.पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार; मंगळवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांची पत्नी रुख्मिणी आणि मुलगा संतोष हे जेवण करून घरासमोर बसले असताना आरोपीने खर्चायला ५०० रूपये मागत त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास जरा काही काम धंदा कर असे सांगितले. याचा राग आल्याने संतोषने त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत कटरने पाठीवर वार केले. त्यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीलाही खर्चायला पैसे न दिल्यास दोघांनाही जीवे मारून (खल्लास करून) टाकण्याची धमकी दिली. इंदापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: The son attack on father for not gave money; Incidents in Indapur taluka