पुण्यात काही घडू शकतं...! शक्तीमान रिक्षावाला; चक्क मारतोय मर्सिडीज गाडीला धक्का, पहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 04:28 PM2022-12-15T16:28:12+5:302022-12-15T16:30:33+5:30

मर्सिडीजला धक्का मारताना व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Something can happen in Pune A Mercedes car hits a rickshaw puller watch the video... | पुण्यात काही घडू शकतं...! शक्तीमान रिक्षावाला; चक्क मारतोय मर्सिडीज गाडीला धक्का, पहा व्हिडिओ...

पुण्यात काही घडू शकतं...! शक्तीमान रिक्षावाला; चक्क मारतोय मर्सिडीज गाडीला धक्का, पहा व्हिडिओ...

googlenewsNext

पुणे : पुण्यात कुठं आणि कधी काही घडू शकतं. असाच एक आश्चर्यचकित करणारा प्रसंग पुण्यात दिसून आला आहे. आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये चक्क रिक्षावाला मर्सिडीज गाडीला धक्का मारताना दिसत आहे. यावर नेटीझन्सने अनेक गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक रिक्षावाला   मर्सिडीजला धक्का मारताना व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

आपल्या गाडीतले पेट्रोल संपले, कि आपण कोणाला तरी टो द्यायला सांगतो. असे प्रसंग अनेक वेळा दुचाकीच्या बाबतीत घडून येतात. तर कधीकधी रिक्षावाले दुसऱ्या रिक्षावाल्याना टो देताना दिसून येतात. परंतु या व्हिडिओमधून चक्क रिक्षाचालक एका नामांकित कंपनीच्या गाडीला धक्का मारताना दिसत आहे. हे पाहून रिक्षाचालकाच्या जिद्दीला दाद दिली जात आहे. समाजमाध्यमांवर अनेकांनी या चालकाचे कौतुक केले आहे. अशा प्रकारच्या जिद्दीने मदत करणारी लोक असतील. तर समाजात वावरताना कोणालाही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. 

व्हिडिओ काय दिसत आहे

कोरेगाव पार्क येथे एक रिक्षाचालक मर्सिडीज गाडीला धक्का मारत आहे. एखाद्या दुचाकीला धक्का मारताना जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. परंतु चारचाकीला रस्त्यावरून धक्का मारत जाणे हे आव्हानच आहे. तरीसुद्धा मदत करण्याची जिद्द असेल. तर आपण काही करू शकतो. हे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे.     

Web Title: Something can happen in Pune A Mercedes car hits a rickshaw puller watch the video...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.