शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक विसर्जनाला सोसायट्यांची पसंती

By admin | Updated: September 12, 2016 02:38 IST

महापालिकेने अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून घरच्या घरी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याच्या केलेल्या आवाहनाला अनेक सोसायट्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पुणे : महापालिकेने अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून घरच्या घरी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याच्या केलेल्या आवाहनाला अनेक सोसायट्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दहा हजार कुटुंबीयांनी अमोनियम बायकार्बोनेटच्या पाण्यात मिसळून घरच्या घरी गणेशमूर्तींचे विसर्जन केले आहे. त्याचबरोबर ४० टन अमोनियम बायकार्बोनेटचे मोफत वाटप करण्यात आले आहे.महापालिका, एनसीएल व कमिन्स इंडिया यांच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार घेण्यात आला. गणेशमूर्तीच्या वजनाएवढे अमोनियम बायकार्बोनेट बादलीमध्ये मिसळून त्यामध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यास ती ४८ तासांच्या आत विरघळून जाते. विसर्जित झालेले पाणी झाडांना खत म्हणून वापरता येते. पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी घरच्या घरी गणेश विसर्जन करण्याचे पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवार पेठेतील आल्हाद सोसायटीमध्ये प्रामुख्याने शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याचबरोबर सोसायटीच्या आवारातच बादलीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विजयसिंह ठोंबरे, प्रशांत भागवत, सुमुख आगाशे, हेमंत खेरुड व इतर सभासदांनी यामध्ये सहभाग घेतला.कर्वेनगर येथील २०० सदनिका असलेल्या सुवर्णरत्न गार्डन सोसायटीने पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एका मोठ्या टबमध्ये पाण्यात अमोनियम बायकाबोर्नेट मिसळले. त्यामध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले, अशी माहिती सोसायटीच्या अध्यक्षा मंजूश्री खर्डेकर यांनी दिली. या वेळी सोसायटीचे उत्सवप्रमुख चंद्रकांत बारटक्के, सचिव स्मिता ढवळीकर, छाया सोनावणे, सरोज कुलकर्णी व अन्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.महापालिकेने सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये अमोनियम बायकार्बोनेट मोफत उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांच्या मागणीनुसार दोन किलोचे अमोनियम बायकार्बोनेटचे पाकीट दिले जात आहे. आतापर्यंत नागरिकांना ४० टन अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप करण्यात आले. शेवटच्या दिवसापर्यंत आणखी मोठ्या प्रमाणात त्याचे वाटप होण्याची अपेक्षा आहे. घरच्या घरी विसर्जनाचा एक आर्दश पुण्याकडून संपूर्ण देशाला घालून दिला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)