शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांचा अजित पवार गटात प्रवेश, कारण आलं समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 09:45 IST

बाबर यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाने शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात त्यांचा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम झाला. बाबर यांच्या पक्ष प्रवेशाने पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. 

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघात, जो अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, तिथे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.हडपसर हा मतदारसंघ महापालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीसाठी सर्वाधिक यशस्वी ठरलेला असून, 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत एकट्या हडपसर मतदारसंघातून 17 ते 18 नगरसेवक निवडून आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतरही अजित पवार यांच्या गटाने या मतदारसंघावर आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे.

ही घटना शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानली जात असून, विशेष म्हणजे याच मतदारसंघातून शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे येतात. त्यांच्या मतदारसंघातूनच अशा महत्त्वाच्या नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने, प्रशांत जगताप यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जातो.

... म्हणून केला राष्ट्रवादीत प्रवेश 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट न मिळाल्यामुळे महादेव बाबर हे नाराज होते. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर महादेव बाबर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती, पण अखेर महादेव बाबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती