....म्हणून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना केला फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 17:35 IST2019-09-27T17:34:34+5:302019-09-27T17:35:34+5:30

आम्ही पुराच्या बाबतीत कोणतेही राजकारण केलेले नाही...

.... So Ajit Pawar calls to devendra fadnavis | ....म्हणून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना केला फोन

....म्हणून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना केला फोन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर सरकारने कोणतेही राजकारण किंवा स्वार्थीपणा केलेला नाही, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले.
   पालकमंत्री असूनही पुणे आणि जिल्ह्यात पूरस्थिती असताना पाटील हे दिल्लीत पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित असल्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे.पुण्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की, आम्ही पुराच्या बाबतीत कोणतेही राजकारण केलेले नाही. मी दिल्लीला जरी गेलो असलो तरी ती बैठक खूप आधीच पूर्वनियोजित होती. त्यात अमित शहा सहभागी होणार होते. त्यामुळे  मी गेलो. पण विमानतळावर गेल्यावरही माझे फोन सुरूच होते.
पुढे ते म्हणाले की,मुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या पूरस्थितीची माहिती मिळाल्यानंतर तिथले आमदार म्हणून अजित पवार यांना फोन केला.कोणतीही मदत हवी असेल तर देऊ असे आश्वस्तही केले. त्यावर पवार यांनी सर्व मदत पोचली असल्याचेही सांगितले.
 

Web Title: .... So Ajit Pawar calls to devendra fadnavis