पुणे : उच्चभ्रू सोसायटीमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांनी छापा टाकला. त्यात मालकासह ५ जणांवर कारवाई करून १२ हजार ४९५ रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
हॉटेल मालक राजसिंग भजनसिंग गोरोवाडा (वय ३५, रा. गुरुनानक कृपा बिल्डिंग, तिसरा मजला, राजमुद्रा सोसायटी, धनकवडी), वेटर पारस परमानंद शर्मा (२४, मूळ रा. नेपाळगंज, जि. बाके, नेपाळ), सुभाष मानसिंग गिरी (२०), तिलक भोला तिवारी (३५), नारायण मेघे आचार्य (३४, सर्व मुळ रा. नेपाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार धनकवडी येथील राजमुद्रा या सोसायटीतील गुरुनानक कृपा बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर सुरू होता.
सहकारनगर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी, अंमलदार हे ९ फेब्रुवारीला पेट्रोलिंग करत गुलाबनगर चौकात आले. पोलिस हवालदार अमोल पवार यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, राजमुद्रा हौसिंग सोसायटीतील मेहेर लिव्हिंग बिल्डिंगशेजारील श्री गुरुनानक कृपा बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्याचे टेरेसवर हुक्का पार्लर विनापरवाना चालू आहे. या माहितीची खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी देऊन टीम तयार करून पाठविली. पोलिस तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर गेले. तेथील लाकडी दरवाजा तोडून आत जाऊन छापा टाकला.
हॉलमध्ये एकूण ६ टेबल मांडलेले दिसून आली. त्यामध्ये ४ टेबलांवर ८ जण हुक्का फ्लेवरचे सेवन करताना मिळाली. या हॉटेलचा राजसिंग गोरोवाडा हा मालक आहे. हॉटेलच्या किचनची पाहणी केली असता तेथे विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीमसह टेबलावर हुक्का पॉट व साहित्य मिळून आले. पोलिसांनी हा सर्व १२ हजार ४९५ रुपयांचा माल जप्त केला. सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : Pune police raided an illegal hookah parlor operating without a license in an upscale Dhanakwadi society. The owner and four others were arrested. Police seized ₹12,495 worth of hookah materials.
Web Summary : पुणे पुलिस ने धनकवडी की एक पॉश सोसायटी में बिना लाइसेंस चल रहे अवैध हुक्का पार्लर पर छापा मारा। मालिक समेत पांच लोगों को गिरफ्तार किया गया। पुलिस ने ₹12,495 मूल्य की हुक्का सामग्री जब्त की।