शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट पुण्यासाठी ‘एडीबी’ देणार

By admin | Updated: August 6, 2015 03:19 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या पुणे

पुणे : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या पुणे महापालिकेस एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) तांत्रिक सल्लागार पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी (दि. ४) मुंबई येथे बँकेच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या बँकेच्या माध्यमातून महापालिकेस स्मार्ट सिटीसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यास मोठी मदत होणार असल्याचे कुमार यांनी सांगितले. यापूर्वी महापालिकेने शहरातील प्रकल्पांसाठी जागतिक बँकेसही निधीसाठी सादरीकरण केलेले आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी राज्य शासनाने पुणे महापालिकेची शिफारस केलेली आहे. त्यानुसार, केंद्राकडून पहिल्या २० शहरांमध्ये पुणे शहराची निवड झाल्यास महापालिकेस पुढील तीन महिन्यांत शहरासाठीचे प्रकल्प सादर करावयाचे आहेत. त्यासाठी केंद्राकडून सल्लागारांची यादी जाहीर करण्यात येणार असली तरी, महापालिकेस आपले सल्लागार नेमता येणार आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेकडून एडीबीच्या अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा करण्यात आली असून बँकेने सल्लागार पुरविण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती कुमार यांनी दिली. याशिवाय या योजनेअंतर्गत महापालिकेस पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपअंतर्गत निधीची उपलब्धता करून घ्यावी लागणार आहे. त्यासाठीही या बँकेची मदत होणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)